Snooker Star Majid Ali Death Dainik Gomantak
क्रीडा

Snooker Star Majid Ali Death: पाकिस्तानच्या स्टार स्नूकरपटूने केली आत्महत्या, नैराश्याशी देत होता झुंज

Snooker Star Majid Ali Death: पाकिस्तानचा स्टार स्नूकरपटू मोहम्मद माजिद अली याने आत्महत्या केली आहे.

Manish Jadhav

Snooker Star Majid Ali Death: पाकिस्तानचा स्टार स्नूकरपटू मोहम्मद माजिद अली याने आत्महत्या केली आहे. तो गेल्या काही वर्षांपासून नैराश्याशी झुंज देत होता. त्याच्या कौटुंबिक सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.

आशियाई अंडर 21 गेम्समधील रौप्यपदक विजेता माजिद अली हा उत्कृष्ट खेळाडू होता. पाकिस्तान बिलियर्ड्स आणि स्नूकर असोसिएशनचे (पीबीएसए) अध्यक्ष आलमगीर शेख यांनी एका मेसेजद्वारे सहकारी खेळाडू आणि क्रीडा संघटनेच्या सदस्यांना ही बातमी दिली.

माजीद नैराश्याशी झुंज देत होता

पाकिस्तान (Pakistan) स्नूकर संघासाठी महिन्याभरातील ही दुसरी बातमी आहे. मोहम्मद बिलाल यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. तर माजिदचा मृत्यू आणखीनच धक्कादायक आहे. माजीदने आत्महत्या (Suicide) केल्याच्या वृत्ताला त्याचा भाऊ उमर याने दुजोरा दिला.

माजीदने फैसलाबादजवळील त्याच्या मूळ गावी आपली जीवन यात्रा संपवली. गेल्या काही वर्षांपासून तो नैराश्याने त्रस्त होता, मात्र नेमके कारण समजू शकले नसल्याचे त्याच्या भावाने सांगितले. जरी त्याला आर्थिक समस्या नव्हती.

दुसरीकडे, पीबीएसएचे अध्यक्ष म्हणाले की, माजीदच्या मृत्यूची माहिती धक्कादायक आहे. ते पुढे म्हणाले की, “तो एक विलक्षण प्रतिभावान होता. नुकताच क्रमवारीतून बाहेर पडला असला तरी त्याने नेहमीच मोठी क्षमता दाखवली आहे. आम्हाला त्याच्या मृत्यूबद्दल कळल्यावर दु:ख झाले आहे, हे पाकिस्तान स्नूकर संघाचे मोठे नुकसान आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT