भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) सामना खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताने चार विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यंदाच्या टी-20 विश्वचषकात अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघाची भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत भारताने एक सामना जिंकला आहे. तर, पाकिस्तानच्या संघाने एक सामना गमावला आहे. परंतु, हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येतील, जो टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना असेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारताला नक्कीच हरवेल, असेही त्यानी म्हटले आहे.
शोएब अख्तरने सांगितले, ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. सुपर-12 फेरीच्या दोन्ही गटात प्रत्येकी सहा-सहा संघाचा समावेश करण्यात आला आहे. या दोन गटातून प्रत्येकी दोन-दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही गट-2 मधून उपांत्य फेरीत पोहोचल्यास त्यांची स्पर्धा गट-अ मधील दोन अव्वल संघांशी होईल, याचा अर्थ उपांत्य फेरी भारत आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकत नाही.
2007 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होणार का?
आयसीसीच्या (ICC) पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडले होते. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवून टी-20 विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यावेळीही भारत पाकिस्तान एकाच गटात होते. यामुळे यंदाच्या टी-20 विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.