Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

ICC ODI Rankings मध्ये पाकिस्तानचे बल्ले-बल्ले, टीम इंडियाचा क्लीन स्वीप

ICC ODI Rankings मध्ये भारतीय संघ सातत्याने पहिल्या 3 मध्ये राहीला आहे.

दैनिक गोमन्तक

ICC ODI Rankings मध्ये भारतीय संघ सातत्याने पहिल्या 3 मध्ये राहीला आहे, परंतु आता भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे मात्र, पाकिस्तान संघाने भारताला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. पाकिस्तान संघाने नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला. (Pakistan Have Left India Behind In The ICC ODI Team Rankings)

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धची (West Indies) मालिका सुरु होण्यापूर्वी, पाकिस्तान 102 रेटिंग गुणांसह ICC ODI क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता, परंतु वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तान 106 च्या रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याचबरोबर भारतीय संघ आता 105 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या वर्षी भारताने केवळ तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्या तीनही सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला.

तसेच, आयसीसी क्रमवारीत पहिले स्थानावर न्यूझीलंड (New Zealand) आहे, ज्याच्या खात्यात 125 रेटिंग गुण आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या खात्यात 124 गुण आहेत तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) खात्यात 107 गुण आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानची नजर ऑस्ट्रेलियाला हरवण्यावर असणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला 14 जूनपासून श्रीलंकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत संघाला क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT