Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानचे फास्ट बॉलर भारताला नडले, Asia Cup मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' विक्रम

IND vs PAK: भारतीय संघातील फलंदाजांना पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी संघर्ष करायला लावला.

Pranali Kodre

Pakistan Fast Bowlers Shaheen Afridi, Haris Rauf Naseem Shah Taking All 10 Wickets against India In Asia Cup ODI Format match:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना शनिवारी झाला. पण हा सामना निकाल न लागतच रद्द झाला. भारतीय संघाच्या डावानंतर पावसाचा जोर वाढल्याने सामना रद्द करावा लागला. असे असले, तरी या सामन्यात एक खास विक्रम नोंदवला गेला.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताचा डाव 48.5 षटकात 266 धावांवर संपला. पाकिस्तानकडून त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.

विशेष म्हणजे पाकिस्तानकडून भारताच्या सर्व 10 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्यामुळे वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात पहिल्यांदाच वेगवान गोलंदाजांनी एका सामन्यात सर्व 10 विकेटेस् घेतल्या आहेत.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या तीन वेगवान गोलंदाजांनी मिळून भारताच्या 10 विकेट्स घेतल्या. शाहिनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रौफ आणि नसीम यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

भारताकडून इशान-हार्दिकची अर्धशतके

भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. शाहिनने सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफने श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांना बाद केलं. त्यामुळे भारताची अवस्था 15 षटकांच्या आतच 66 धावांत 4 विकेट्स अशी झाली होती.

पण नंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशनने अर्धशतके झळकावताना 138 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचली आणि भारताला 200 धावांचा आकडला पार करून दिला. मात्र या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले.

हार्दिक 90 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 87 धावा करून बाद झाला आणि इशान 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावा करून बाद झाला. इशानला रौफने, तर हार्दिकला इशानने बाद करत पाकिस्तानला सामन्यात पुनरागमन करून दिले. नंतर नसीम शाहने भारताची तळातली फलंदाजी गुंडाळली.

पाकिस्तानची सुपर फोरमध्ये धडक

दरम्यान, हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानने सुपर फोरमधील स्थान पक्के केले आहे. सध्या पाकिस्तान अ गटात अव्वल क्रमांकावर आहे. तसेच पाकिस्तानने नेपाळविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात 238 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचे आता 3 गुण झाले आहेत.

तसेच अ गटात असलेल्या भारताकडे 1 गुण आहे, तर नेपाळच्या खात्यात शुन्य गुण आहेत. त्यामुळे आता 4 सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ संघात होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणारा संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान इथेच संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT