Shoaib Malik Dainik Gomantak
क्रीडा

Shoaib Malik साठी T20 WC संघाचे दार बंद? बाबर आझमने दिले सडेतोड उत्तर

Shoaib Malik: शोएब मलिक T20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट संघात परतणार का?

दैनिक गोमन्तक

Pakistan Cricket Team: शोएब मलिक T20 विश्वचषक 2022 साठी पाकिस्तान क्रिकेट संघात परतणार का? यावर कर्णधार बाबर आझमने सडेतोड उत्तर दिले आहे. बाबर म्हणाला की, 'संघाने युवा क्रिकेटपटूंना अधिक संधी देण्याची गरज आहे.' बाबर आझमच्या या उत्तरावरुन पाकिस्तानी क्रिकेट संघाचे दरवाजे आता वरिष्ठ खेळाडूंसाठी बंद झाल्याचे संकेत मिळत आहेत. शोएब मलिकने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला होता, त्याचबरोबर त्याच्या देशांतर्गत टी-20 लीगमधील कामगिरीने खूप प्रभावित केले होते.

दरम्यान, स्थानिक मीडियासोबतच पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेटपटूंचेही म्हणणे आहे की, शोएब मलिकची (Shoaib Malik) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात निवड करावी. दुसरीकडे, बाबर आझमला (Babar Azam) याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'नेदरलँड (Netherlands) दौऱ्यानंतर लगेच सामने खेळवायचे असतील तर संघात कोणतेही बदल करणे कठीण आहे. वरिष्ठ खेळाडू संघातून बाहेर पडतात तेव्हा त्यांची जागा घेणाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.'

बाबर पुढे म्हणाले, “मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक ही मोठी नावे आहेत. आम्हाला त्यांची खूप आठवण येते, परंतु आसिफ अली, खुशदिल शाह आणि इफ्तिखार अहमद यांना त्यांची जागा भरावी लागेल. आम्हाला त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी द्यायची आहे, जेणेकरुन त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि हे सर्व खेळाडू मैदानावर चांगली कामगिरी करतील.''

शिवाय, पाकिस्तान (Pakistan) संघ रॉटरडॅम येथे तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. यानंतर संघ दुबईला रवाना होईल, जिथे 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT