IND vs PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

India vs Pakistan Black Magic Allegation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून तो एक हायहोल्टेज थरार असतो.

Manish Jadhav

India vs Pakistan Black Magic Allegation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून तो एक हायहोल्टेज थरार असतो. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर सध्या सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान मैदानावर खेळाडू झुंजत असताना मैदानाबाहेर मात्र पाकिस्तानकडून एक अत्यंत धक्कादायक आणि हास्यास्पद दावा करण्यात आला. भारतीय संघ आपली गुणवत्ता किंवा मेहनतीने नाही, तर चक्क जादूटोणा करुन सामने जिंकतो, असा अजब आरोप पाकिस्तानच्या एका क्रीडा विश्लेषकाने केला.

पाकिस्तानचे क्रिकेट विश्लेषक असद आर चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "हे कदाचित अंधश्रद्धेसारखे वाटू शकते, पण भारत-पाकिस्तानसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये भारत पाकिस्तानी टीमवर जादू करतो. भारतीय तांत्रिक या खेळाडूंवर काळी जादू करतात, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ पराभूत होतो." या विधानामुळे क्रीडा विश्वात संतापाची लाट उसळली असून भारताच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि स्वतःच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान आता नैराश्यातून असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानकडून (Pakistan) असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता, तेव्हाही पाकिस्तानी मीडियाकडून अशाच प्रकारचे दावे करण्यात आले होते. 'डिस्कवर पाकिस्तान' सारख्या चॅनेलवरील कार्यक्रमांमध्ये तर असा दावा करण्यात आला होता की, भारताचा विजय हा केवळ पूजा, प्रार्थना आणि जादू-टोण्यामुळे झाला आहे. स्वतःच्या खेळाडूंच्या क्षमतेवर आणि तंत्रावर काम करण्याऐवजी निकालाच्या आधीच पराभवाची कारणे शोधण्यासाठी पाकिस्तान आता तंत्र-मंत्राचा आधार घेत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

एकीकडे योग्य नियोजनाच्या जोरावर भारतीय खेळाडू मैदानात कामगिरी करत असताना, पाकिस्तानचे हे 'जादूटोणा' प्रकरण म्हणजे जगभरात स्वतःचीच नाचक्की करुन घेण्यासारखे आहे. खेळाला खेळाच्या भावनेने खेळण्याऐवजी, अशा प्रकारे धार्मिक किंवा अंधश्रद्धेचा रंग देणे हे आधुनिक क्रिकेटच्या काळात अनाकलनीय आहे. असद आर चौधरी यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली असून "मैदानात कामगिरी होत नसेल तर तांत्रिकाला दोष देऊन काय फायदा?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT