Sarfraz Ahmed Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: सर्फराज अहमदच्या हेल्मेटने बनवला खास रेकॉर्ड, तब्बल 18 वर्षांनंतर...

Sarfraz Ahmed: न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान किवी संघाला दोन्ही डावात पाच धावांची पेनल्टी मिळाली. दोन्ही डावात चेंडू पाकिस्तानी यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या हेल्मेटला लागला.

दैनिक गोमन्तक

PAK vs NZ 1st Test: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात असाच एक पराक्रम घडला, जो 18 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये घडला होता. यामध्ये पाकिस्तानला दोन्ही डावात पाच धावांची पेनल्टी देण्यात आली. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान किवी संघाला दोन्ही डावात पाच धावांची पेनल्टी मिळाली. दोन्ही डावात चेंडू पाकिस्तानी यष्टीरक्षक सर्फराज अहमदच्या हेल्मेटला लागला. अशाप्रकारे न्यूझीलंडला दोन्ही डावात पाच धावांची पेनल्टी मिळाली.

हे 18 वर्षांपूर्वी घडले

यापूर्वी, 2004 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात असे घडले होते, जेव्हा दोन्ही डावात चेंडू यष्टीरक्षक अहमदच्या हेल्मेटला लागला होता. आज पुन्हा एकदा 18 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये असे घडले, जेव्हा दोन्ही डावात चेंडू यष्टीरक्षकाच्या हेल्मेटला लागल्याने संघाला 5 धावांची पेनल्टी मिळाली.

सर्फराज अहमद तब्बल चार वर्षांनी पुनरागमन करत आहे

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळल्या गेलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात सर्फराज अहमद तब्बल चार वर्षांनी पाकिस्तानच्या कसोटी संघात परतला. या सामन्याच्या दोन्ही डावात सर्फराजने अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 9 चौकारांच्या मदतीने 86 धावा काढल्या. दुसऱ्या डावात त्याने 7 चौकार लगावत 53 धावा केल्या. सर्फराजचा हा 50 वा कसोटी सामना होता.

यापूर्वी, त्याने 11 जानेवारी 2019 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतकही झळकावले होते.

सलग पाचवा पराभव वाचवला

हा सामना अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानने (Pakistan) घरच्या मैदानावर सलग पाचवा पराभव वाचवला. याआधी संघाने घरच्या मैदानावर सलग चार कसोटी सामने गमावले. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका गमावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

"दक्षिण गोव्‍यात येण्‍याची चूक करू नका..." टॅक्‍सीवाल्‍यांनी केली दमदाटी, अहमदाबाद येथील महिलेनं व्‍हिडिओद्वारे व्‍हायरल केली व्यथा Watch Video

SCROLL FOR NEXT