Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: और इनको कश्मीर चाहिए! देशाचा झेंडा उलटा धरलेला पाकिस्तानी चाहता झाला ट्रोल

क्रिकेट मैदानात दोन्ही संघाची जेवढी टसल पाहायला मिळते तेवढीच फॅन्स देखील एकमेकांना टसल देत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Match) यांच्या T20 विश्वचषकातील (T20 WC) पहिला समाना MCG मैदानावर खेळण्यात आला. हाय व्होलटेज् या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. अखेरचं षटक अखेरच्या चेंडूपर्यंत चालेला हा सामना अनेक अर्थाने रोमहर्षक झाला. क्रिकेट मैदानात दोन्ही संघाची जेवढी टसल पाहायला मिळते तेवढीच फॅन्स देखील एकमेकांना टसल देत असतात.

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एक पाकिस्तानी चाहता आपल्या देशाचा झेंडा उलटा फडकवत असताना दिसत आहे. एका भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला त्याच चूक लक्षात आणून दिली आणि झेंडा उलटा असल्याचे लक्षात आल्यावर त्याने झेंडा सरळ केला. यावर भारतीय चाहत्याने और इनको कश्मीर चाहिए! असा टोमणा मारला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मजेशीर कमेन्ट करताना विविध फोटो, मीम्स आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा विजयी शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT