Olympics Awareness Programme: Distinguished guests honored for their contribution to Badminton. Dainik Gomantak
क्रीडा

Olympics Awareness Programme: मिरामारला रंगला बॅडमिंटन महोत्सव

Olympics Awareness Programme: सुमारे साठ मुलं आणि त्यांच्या पालकांनी आनंद लुटला

दैनिक गोमंतक

पणजीः टोकियो ऑलिंपिक बॅडमिंटनमधील महिला एकेरीतील पी. व्ही. सिंधू हिच्या उपांत्य सामन्याचे थेट प्रक्षेपण, तसेच ऑलिंपिक जागृती कार्यक्रमांतर्गत (Olympics Awareness Programme) बॅडमिंटनसाठी योगदान दिलेल्यांचा सत्कार या कारणास्तव मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस संकुलास शनिवारी बॅडमिंटन महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिंधू आणि तई झू-यिंग यांच्यातील यांच्यातील सामन्याचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे (Goa Badminton Association) थेट प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे साठ मुलं आणि त्यांच्या पालकांनी या सामन्याचा आनंद लुटला. त्यानंतर गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे लुसियान सुवारिस, सर्फराज शेख, यशवंतराव देसाई, अनिकेत शेणई, मरिना आल्बुकर्क यांनी राज्य बॅडमिंटनमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारताची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर, सचिव संदीप हेबळे, कार्यक्रम समन्वयक चेतन कवळेकर यांची उपस्थिती होती.

फोंडा येथे दौड

ऑलिंपिक जागृतीनिमित्त फोंडा येथे शनिवारी तायक्वांडो असोसिएशन ऑफ गोवा, ज्युडो असोसिएशन, फोंडा जिम्नॅस्टिक्स यांनी गोवा ऑलिंपिक असोसिएशन व फोंडा पोलिस यांच्या सहकार्याने दौड आयोजित केली. पोलिस अधिकारी मोहन गावडे यांनी दौडीस हिरवा बावटा दाखविला. यावेळी गोवा ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. आर. डी. मंगेशकर, सुनील शर्मा, शिवकरण केवत, जयवंत हम्मणावर, दीपक मांद्रेकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT