Ollie Pope ANI
क्रीडा

IND vs ENG: 'भारतात येण्यापूर्वी आम्ही...', ऑली पोपने उघडले हैदराबाद कसोटीतील इंग्लंडच्या विजयाचे रहस्य

Ollie Pope: ऑली पोपने भारताविरुद्ध हैदराबादमध्ये कसोटीत 196 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Pranali Kodre

India vs England, Test Match, Ollie Pope:

इंग्लंडने भारताविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात २८ धावांनी विजय मिळवला. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयासह इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या या विजयात फलंदाज ऑली पोपचे मोठे योगदान राहिले. त्याने या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही जिंकला.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात तब्बल 190 धावांची आघाडी घेतली होती. पण पोपने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत केलेल्या 196 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात तब्बल 420 धावा उभारल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताला दुसऱ्या डावात 202 धावाच करता आल्या.

दरम्यान, सामन्यानंतर आपल्या फलंदाजीबद्दल सांगताना पोपने खुलासा केला की इंग्लंड संघ पूर्ण तयारी करून आला असून भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी त्यांनी विशेष सराव केला आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी इंग्लंडचे अबुधाबीमध्ये सराव शिबीर पार पडले होते. यादरम्यान, इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी केली आहे.

पोपने सांगितले की 'भारताकडे खुप कौशल्यपूर्ण गोलंदाज आहेत. जर तुम्ही प्रत्येक चेंडूवर बचाव करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचीत तुम्ही बाद होण्याची शक्यता जास्त आहे, त्यापेक्षा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला.'

'आम्ही इथे येण्यापूर्वी त्या शॉट्सचा सराव केला आहे. मला वाटते तुम्ही फक्त त्याबद्दल वचनबद्ध असायला हवे. रिव्हर्स स्विप किंवा स्विप खेळणे देखील बचाव करण्याप्रमाणेच सुरक्षित असू शकते.'

तसेच पोपने सांगितले की अबुधाबीमध्ये झालेल्या शिबिरामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

पोप म्हणाला, 'आम्ही अबुधाबीमध्ये बरेच काम केले. कदाचीत त्याचमुळे आम्ही मोठ्या पिछाडीनंतरही पुनरागमन करू शकलो. एक संघ म्हणून आम्हाला हेच करायचे आहे. आशा आहे आम्ही हे भविष्यातही करत राहू.'

दरम्यान, पोप गेल्यावर्षी ऍशेस मालिकेदरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. परंतु, त्यानंतर त्याने आता यशस्वी पुनरागमन केले आहे. याबद्दलही तो म्हणाला की त्याला पुनरागमनाची काळजी होती.

तसेच तो म्हणाला, 'मी असा खेळाडू आहे की मला मी सर्वोत्तम लयीत आहे, असे वाचण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. पण मला वाटते याचे श्रेय ब्रेडंन मॅक्युलम आणि बेन स्टोक्सला आहे, कारण आमच्यासाठी पूर्ण आठवडा चांगला गेला.'

पोपने असेही सांगितले की त्याने तो दुखापतीमुळे संघातून बाहेर असताना त्याने त्याच्या फलंदाजीवरही काम केले. तसेच तो या मालिकेसाठी इंग्लंडचा उपकर्णधारही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Soha Ali Khan: 'गर्ल गँग'सोबत सोहाची पूलसाईड धमाल, गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर हिट!

India vs Australia T20I Series: सूर्या ब्रिगेडला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांतून स्टार अष्टपैलू बाहेर; बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट

साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

Dovorlim: दवर्लीत पुन्हा नाट्यमय घडामोड! सरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला; भाजपला दणका

SCROLL FOR NEXT