Novak Djokovic and Carlos Alcaraz Dainik Gomantak
क्रीडा

जोकोविचने घेतला विम्बल्डनचा बदला; Cincinnati Final मध्ये अल्कारेझला रडवले; शर्ट फाडून केला जल्लोष...

Novak Djokovic Video: सिनसिनाटी मास्टर्सच्या फायनलमध्ये जोकोविचने अल्कारेजला पराभूत करत विम्बल्डन पराभवाचा काढला वचपा

Pranali Kodre

Novak Djokovic tears shirt with roar during celebration, but Carlos Alcaraz cries after Cincinnati Masters final:

रविवारी (20 ऑगस्ट) सिनसिनाटी ओपन या एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अत्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात दिग्गज नोवाक जोकोविचने 20 वर्षीय कार्लोस अल्कारेजचा पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. यानंतर कोर्टवर दोन विरुद्ध भावनांचे दर्शन टेनिस चाहत्यांना झाले.

अंतिम सामन्यात जोकोविचने 5-7, 7-6 (7), 7-6 (4) अशा फरकाने तीन सेट विजय मिळवला. हा अंतिम सामना तब्बल 3 तास 49 मिनिटे चालला. त्यामुळे एटीपी मास्टर्स स्पर्धेतील सर्वाधिक काळ चालणाऱ्या अंतिम सामन्यांपैकी हा एक सामना ठरला. तसेच हे जोकोविचसाठी विक्रमी 39 वे एटीमी मास्टर्स 1000 चे विजेतेपद ठरले.

दरम्यान, तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच आणि अल्कारेज या दोघांनाही सामना जिंकण्याची संधी होती. पण यात जोकोविचने बाजी मारली आणि विजेतेपद जिंकले. हे विजेतेपद जिंकल्यानंतर जोकोविच आणि अल्कारेजला भावना अनावर झाल्या होत्या. जोकोविचच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद होता, तर अल्कारेजच्या डोळ्यात अश्रू होते.

जोकोविचने जिंकल्यानंतर त्याचा शर्ट फाडून जोरात डरकाळी फोडत विजयाचे सेलिब्रेशन केले, तर त्याचवेळी अल्कारेज मात्र कोर्टवरील सोफ्यावर बसून टॉवेलने तोंडू झाकून रडताना दिसला. या क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, असे असले, तरी अल्कारेज ज्या प्रकारे त्याचे टेनिस खेळत आहे, त्याबद्दल सामन्यानंतर जोकोविचने त्याचे कौतुक केले आहे.

विम्बल्डन पराभवाचा काढला वचपा

याचवर्षी जुलैमध्ये झालेल्या विम्बल्डन २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचला अल्कारेजने पराभूत केले होते.

अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 अशा पाच सेटमध्ये पराभूत करत कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले होते. पण या पराभवानंतर एक महिन्यातच जोकोविचने अल्कारेजला पराभवाचा धक्का देत एकप्रकारे विम्बल्डन पराभवाचा वचपाच काढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT