Rafael Nadal & Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Novak Djokovic Retirement: राफेल नदालपूर्वी नोव्हाक जोकोविच होणार निवृत्त? आईने सांगितला रिटायरमेंटचा प्लान

Novak Djokovic Retirement Update: टेनिसप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Manish Jadhav

Novak Djokovic Retirement Update: टेनिसप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालच्या आधी तो निवृत्ती घेऊ शकतो.

वास्तविक, नोव्हाक जोकोविचच्या नातेवाईकांनी या प्रकरणाला हवा दिली आहे. जोकोविचच्या कुटुंबीयांचे म्हणणे खरे असेल, तर नदालच्या पुनरागमनापूर्वी त्याची निवृत्त होण्याची शक्यता जास्त आहे.

त्याचबरोबर, जोकोविचच्या आईनेही निवृत्तीबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विम्बल्डन 2023 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचला कार्लोस अल्काराझकडून पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने (Roger Federer) गेल्या वर्षीच निवृत्ती घेतली. नदाल दुखापतग्रस्त असताना बिग थ्रीपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच जगभरातील चाहत्यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.

कारण जोकोविचच्या कुटुंबीयांनी त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला हवा दिली आहे. अशा स्थितीत नदालच्या शेवटच्या प्रोफेशनल दौऱ्यापूर्वी तो निवृत्त होऊ शकतो.

खरे तर, नोव्हाक जोकोविचवरील 'नोव्हाक जोकोविच-अनटोल्ड स्टोरी' या नवीन डॉक्युमेंटीमध्ये त्याची आई दिजाना यांनी त्यांच्या मुलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दिजाना म्हणाल्या की, 'माझ्या मुलाने "सर्व काही" साध्य केले आहे.

त्याला जे काही लगेच मिळवायचे होते, ते त्याला मिळाले. आता सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे, माझ्या मते तो (नोवाक) आता निवृत्त होऊ शकतो.'

त्याचवेळी, नोव्हाकचे वडील श्रीदान जोकोविच यांनी देखील सांगितले की, 'त्यांच्या मुलाने लवकरात लवकर निवृत्ती घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे.

श्रीदान पुढे म्हणाले की, “माझ्या त्याच्याबद्दलच्या इच्छा, त्याने सात-आठ वर्षांपूर्वीच त्या सर्व पूर्ण केल्या आहेत. बाकी सर्व काही बोनस आहे. टेनिस हा त्याच्या आयुष्याचा भाग आहे.'

दुसरीकडे, नोव्हाक जोकोविचला विम्बल्डन 2023 दरम्यान सेरेना विल्यम्सच्या 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्याची सुवर्णसंधी होती, परंतु कार्लोस अल्काराझने विम्बल्डन सामन्यात त्याला पराभूत केले.

नदालने निवृत्तीचे संकेतही दिले

तसेच, या वर्षाच्या सुरुवातीला नदालने हिपच्या दुखापतीमुळे फ्रेंच ओपन (French Open) 2023 मधून माघार घेतली होती. त्यामुळे तो बराच काळ कोर्टाबाहेर होता. त्यानंतर नदालनेही पुढील वर्ष कारकिर्दीच्या दृष्टीने शेवटचे असेल, असा खुलासा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Viral Video: 1997 साली जमिनीखाली गाडलं गेलेलं जलजीराचे पॅकेट 27 वर्षानंतर जसंच्या तसं सापडलं, नेटकरी म्हणाले, 'Don't Use Plastic'

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

SCROLL FOR NEXT