Novak Djokovic | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: विराटच्या यशाचे टेनिस सम्राटालाही अप्रूप! 50व्या शतकानंतर जोकोविच म्हणाला...

Novak Djokovic: विराटने 50 वे वनडे शतक ठोकल्यानंतर टेनिस स्टार नोवाक जोकोविचनेही कौतुक केले आहे.

Pranali Kodre

Novak Djokovic reacted on Virat Kohli's 50th ODI Century:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दणक्यात प्रवेश मिळवला आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघात रंगला. या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवला.

भारताच्या या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीचेही मोठे योगदान राहिले. त्यामुळे त्याचे या सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले. सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनेही विराटचे कौतुक केले आहे.

विराटने या सामन्यात 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 50 वे शतक होते. त्यामुळे तो वनडेत 50 शतके ठोकणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी कोणालाही वनडेत 50 शतके करता आली नव्हती.

विराटने 50 वे वनडे शतक करताना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला. याबद्दल त्याच्यावर सध्या स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

जोकेविचने केलं अभिनंदन

सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचने बीसीसीआयने विराटच्या 50 शतकाबद्दल केलेले ट्वीट रिट्वीट करत त्यावर लिहिले की 'अभिनंदन विराट कोहली. दिग्गज.'

जोकोविचच्या या ट्वीटवर अनेक युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातीन अनेकांनी म्हटले आहे की 'एका दिग्गजाकडून दुसऱ्या दिग्गजाचे कौतुक होत आहे'.

बेकहॅमकडूनही कौतुक

बुधवारी उपांत्य सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम देखील उपस्थित होता. त्यामुळे त्यालाही विराटच्या 50व्या वनडे शतकाचा साक्षीदार होता आहे. त्यानेही विराटचे त्याच्या पराक्रमाबद्दल कौतुक केले.

भारताचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताकडून विराट व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 105 धावांची शतकी खेळी केली. तसेच शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 50 षटकात 4 बाद 397 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 3 विकेट्स घेतल्या, तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

त्यानंतर न्यूझीलंडचा 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 48.5 षटकात सर्वबाद 327 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने 134 धावांची शानदार खेळी केली. तसेच केन विलियम्सनने 69 धावांची खेळी केली, तर ग्लेन फिलिप्सने 41 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना न्यूझीलंडला विजय मिळवून देता आला नाही.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 विकेट घेता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT