Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Novak Djokovic Fined: जोकोविचला चूकीला माफी नाहीच! विम्बल्डन फायनलमधील पराभवानंतर तब्बल साडेसहा लाखांचा दंड

Novak Djokovic Fined: नोव्हाक जोकोविचला कार्लोस अल्कारेजविरुद्ध विम्बल्डनच्या अंतिम सामन्यातील एका चूकीसाठी तब्बल साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Pranali Kodre

Novak Djokovic Fine For smashing Racket In Wimbledon Final: रविवारी विम्बल्डन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना कार्लोस अल्कारेज आणि नोव्हाक जोकोविच यांच्यात पार पडला.

या सामन्यात 20 वर्षांच्या अल्कारेजने सार्बियाच्या जोकोविचला 5 सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला. जोकोविचला या सामन्यातील पराभवानंतर दंडही ठोठावण्यात आला.

जोकोविचला दंड

या सामन्यात जोकोविचचे रागावर नियंत्रण राहिले नव्हते. त्याने एका क्षणी रागात त्याची रॅकेटही मोडली. त्याच चूकीसाठी त्याला दंड ठोठवण्यात आला आहे.

आचार संहितेचा भंग झाल्याने त्याला 6117 युरोंचा (भारतीय चलनानुसार साधारण 6 लाख 57 हजार) दंड ठोठावण्यात आला आहे. हा यावर्षी या स्पर्धेत वैयक्तिक खेळाडूला ठोठवण्यात आलेला सर्वाधिक रक्कमेचा दंड आहे.

जोकोविचला राग अनावर

जोकोविचने रॅकेट तोडण्याची घटना अंतिम सामन्यातील पाचवा आणि निर्णायक सेट सुरु असताना घडली. या सेटदरम्यान अल्कारेजविरुद्ध एक सर्व्ह गमावल्यानंतर जोकोविचचा पार चढला होता. त्याने रागाच्या भरात नेट पोस्टवर त्याची रॅकेट जोरात आपटली. त्यामुळे रॅकेट मोडली.

दरम्यान, या घटनेबद्दल त्याला लगेचच चेतावणीही देण्यात आली होती. जोकोविच दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्येही चिडलेला दिसला होता. तसेच त्याने सर्व्ह करण्यासाठी वेळ लावल्यानेही त्याला चेतावणी देण्यात आली होती.

यापूर्वी व्हावे लागलेले स्पर्धेतून बाहेर

साल 2020 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत जोकोविचने रागात मारलेला एक चेंडू लाईनमन जजच्या गळ्याला लागला होता. त्यामुळे जोकोविचवर कडक कारवाई करण्यात आलेली. त्याला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले होते.

अल्कारेजने दिला पराभवाचा धक्का

अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 असे पराभूत केले. त्यामुळे जोकोविचला दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्यापासून अल्कारेजने रोखले.

जोकोविच कारकिर्दीतील आठवे आणि सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सेंटर कोर्टवर उतरला होता. पण त्याला अल्कारेजने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे जोकोविचला रॉजर फेडररच्या 8 विम्बल्डन विजेतेपदाच्या विक्रमाला गवसणी घालता आली नाही.

त्याचबरोबर जोकोविचचे 24 ग्रँडस्लॅम जिंकण्याची प्रतिक्षाही लांबली आहे. त्याने जर हे विजेतेपद जिंकले असते, तर त्याने मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिब चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT