Northeast United

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: हॅटट्रिकवीर देशॉर्नचा धडाका !

नॉर्थईस्ट युनायटेडने इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सोमवारी गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला (Mumbai City FC) 3-3 असे गोलबरोबरीत रोखले.

दैनिक गोमन्तक

पणजी: अफलातून कमबॅक केलेल्या देशॉर्न ब्राऊन याच्या धडाकेबाज हॅटट्रिकच्या बळावर नॉर्थईस्ट युनायटेडने (Northeast United) इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सोमवारी गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला (Mumbai City FC) 3-3 असे गोलबरोबरीत रोखले. चुरशीचा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. सामन्याच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले, पण यश न मिळाल्यामुळे बरोबरी कायम राहिली.

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या जमैकाच्या 31 वर्षीय देशॉर्न ब्राऊन याने जबरदस्त खेळ केला, त्यामुळे मुंबई सिटीस विजय साकारता आला नाही. देशॉर्नने अनुक्रमे 29, 56 व 80व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला, त्यामुळे उत्तरार्धाच्या सुरवातीस पिछाडीवर पडलेल्या नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली. देशॉर्नने आता यंदाच्या स्पर्धेत पाच सामन्यांत चार गोल केले आहेत.

त्यापूर्वी स्पॅनिश इगोर आंगुलोच्या दोन गोलमुळे मुंबई सिटीने पिछाडीवरून आघाडी घेतली होती. आंगुलोने 33व्या मिनिटास संघाला बरोबरी साधून दिली, नंतर 52व्या मिनिटास आघाडी भक्कम करणारा गोल केला. या 37 वर्षीय स्ट्रायकरने आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सर्वाधिक गोल नोंदविण्याचा मान मिळविला आहे. त्याने आठ सामन्यांत सात गोल करताना हैदराबादच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर एका गोलची आघाडी घेतली आहे. मुंबई सिटीसाठी अन्य एक गोल बिपिन सिंग याने 40व्या मिनिटास केला. त्याचा हा यंदाचा आठ लढतीतील तिसरा गोल ठरला.

मुंबई सिटीचे अव्वल स्थान कायम

मुंबई सिटीची ही मोसमातील पहिलीच बरोबरी ठरली. त्यांचे आठ लढतीतून 16 गुण झाले असून अव्वल स्थान कायम राहिले. स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक 20 गोल नोंदविले आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडला नऊ लढतीत दुसऱ्यांदा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांचे आठ गुणांसह नववे स्थान कायम राहिले.

हैदराबादला ओडिशाचे आव्हान

आयएसएल स्पर्धेच्या आठव्या मोसमात मंगळवारी (ता. 28) बांबोळी येथील एथलेटिक स्टेडियमवर हैदराबाद एफसीला ओडिशा एफसीचे आव्हान असेल. सलग सहा सामने अपराजित (3 विजय, 3 बरोबरी) असलेल्या हैदराबादचे सात सामन्यांतून 12 गुण आहेत. मागील तीन लढतीतून फक्त एकच गुण प्राप्त केलेल्या ओडिशाचे एकूण सात सामन्यानंतर दहा गुण आहेत.

मोसमातील दुसरी हॅटट्रिक

नॉर्थईस्ट युनायटेडच्या (Northeast United) देशॉर्न ब्राऊनने सोमवारी आयएसएल आठव्या मोसमातील दुसरी हॅटट्रिक नोंदविली. पहिली हॅटट्रिक 14 डिसेंबर रोजी वास्को येथे ओडिशाविरुद्ध जमशेदपूरच्या ग्रेग स्टुअर्टने नोंदविली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT