Indian Super League: क्लिफर्ड बनले एफसी गोवाचे अंतरिम प्रशिक्षक !

सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा (Clifford Miranda) यांच्याकडे क्लबने सोमवारी अंतरिम प्रशिक्षकपदाचा ताबा दिला.
Clifford Miranda

Clifford Miranda

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: स्पेनचे हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांनी अचानक एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षकपद त्यागून एटीके मोहन बागान (ATK Mohan Bagan) संघात रुजू होण्याचे ठरविल्यानंतर, सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा (Clifford Miranda) यांच्याकडे क्लबने सोमवारी अंतरिम प्रशिक्षकपदाचा ताबा दिला.

फेरांडो यांना जबाबदारीतून मुक्त केल्या जाहीर करताना एफसी गोवा (FC Goa) संघ व्यवस्थापनाने संबंधित प्रकरणी पुढील घोषणा लवकरच करण्याचे नमूद केले. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदी नव्या नियुक्तीचे संकेत मिळत आहेत.

<div class="paragraphs"><p>Clifford Miranda</p></div>
Indian Super League: चेन्नईयीनची विजयासह मुसंडी; ओडिशा पराभूत

गोमंतकीय क्लिफर्ड 2020-21 मोसमापासून फेरांडो यांचे सहाय्यक होते. एफसी गोवाचे सध्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेच्या आठव्या मोसमात सहा सामन्यांतून सात गुण आहेत. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर ओडिशा एफसीविरुद्ध (Odisha FC) होईल. त्यावेळी संघ क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. सलग तीन सामने गमावल्यानंतर एफसी गोवाने दोन विजय व एका बरोबरीसह कामगिरी सुधारली.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सोमवारी फेरांडो यांना जबाबदारीतून मुक्त केल्याचे जाहीर केले. फेरांडो यांना गमावणे क्लबसाठी निराशाजनक असून मोसमाच्या मध्यास त्यांचा निर्णय अनपेक्षित आणि आश्चर्यजनक असल्याचे रवी यांनी नमूद केले. फेरांडोप्रकरणी एफसी गोवा संघ व्यवस्थापनास रविवारी सकाळपर्यंत अंधारात ठेवण्यात आले, त्याबद्दलही रवी यांनी नाराजी व्यक्त केली. फेरांडो यांनी करारातील मुक्तता अटीस चालना दिल्यानंतर आमच्यापाशी अन्य पर्याय नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com