Ravindra Jadeja - R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

ICC Awards 2023: सर्वोत्तम कसोटीपटूसाठी भारताच्या एकमेव खेळाडूला नामांकन, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे खेळाडूही शर्यतीत

ICC Awards: आयसीसीने 2023 वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केले आहेत.

Pranali Kodre

Nominees for ICC Men’s Test Cricketer of the Year 2023:

नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनेही गेल्यावर्षी दमदार कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी वार्षिक पुरस्कार वितरणाची घोषणा केली आहे. यासाठी सध्या आयसीसीकडून प्रत्येक क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन दिले जात आहे.

त्यानुसार शुक्रवारी आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी चार खेळाडूंना नामांकन दिले आहे.

यामध्ये ऑस्ट्रेलियाचे ट्रेविस हेड आणि उस्मान ख्वाजा या दोघांचा समावेश, तर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जो रुट यांनाही नामांकन मिळाले आहे. या चौघांनीही 2023 मध्ये कसोटीत चांगली कामगिरी केली आहे.

आर अश्विनने 2023 वर्षात 7 कसोटी सामन्यातील 13 डावात गोलंदाजी करताना 17.02 च्या सरासरी 41 विकेट्स घेतल्या. त्याने भारताला कसोटी चॅम्पियनशीप २०२१-२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तो सध्या कसोटी क्रमावारीत गोलंदाजांच्या यादीतही अव्वल स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ट्रेविस हेडने 2023 वर्षात 12 कसोटी सामने खेळताना 42.22 च्या सरासरीने 929 धावा केल्या. तसेच त्याने 4 विकेट्सही घेतल्या.

त्याने ऑस्ट्रेलियाला कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धा जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला. भारताविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने शतक करत ऑस्ट्रेलियाला कसोटीतील विश्वविजेता बनवण्यात योगदान दिले.

याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजानेही शानदार खेळ 2023 वर्षात केला. तो ऑस्ट्रेलियाकडून 2023 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडूही राहिला. त्याने 13 कसोटीत 52.60 च्या सरासरीने 3 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1210 धावा केल्या.

त्याने ऑस्ट्रेलियाला कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. तसेच त्याने ऍशस मालिकेतही चांगली कामगिरी केली होती.

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटला पुन्हा एकदा या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे. त्याने 2023 वर्षात 8 कसोटी सामन्यांमध्ये 65.58 च्या सरासरीने 878 धावा करण्याबरोबरच 8 विकेट्सही घेतल्या. तो यावर्षात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे. त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतके केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT