Virat Kohli - Ravindra Jadeja X
क्रीडा

ICC Awards 2023: सर्वोत्तम क्रिकेटरसाठी कोहली-जडेजाची वर्ल्डकप फायनलमध्ये नडणाऱ्या दोन ऑस्ट्रेलियन्सशी टक्कर

Pranali Kodre

Nominees for ICC Men’s and Women's Cricketer of the Year 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरवर्षी सर्वोत्तम खेळाडूंना पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार देण्याआधी प्रत्येक विभागात वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नामांकन देण्यात येते. त्यानुसार यावेळीही आयसीसीने २०२३ वर्षातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत.

सर्वोत्तम पुरुष खेळाडूंसाठी नामांकन

आयसीसीकडून सर गॅरी सोबर्स ट्रॉफी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूला देण्यात येते. या पुरस्कारासाठी दोन ऑस्ट्रेलियन आणि दोन भारतीय खेळाडूंना नामांकन देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड आणि पॅट कमिन्स यांना, तर भारताच्या विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

विराट कोहलीने 2023 वर्षात 35 सामन्यांमध्ये 2048 धावा केल्या आहेत. त्याने यावर्षात 8 शतकेही केली. यामध्ये त्याच्या कारकिर्दीतील 50 व्या वनडे शतकाचाही समावेश आहे, जे त्याने वर्ल्डकप 2023 स्पर्धत नोंदवले होते.

तसेच रविंद्र जडेजा 2023 मधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 35 सामन्यांमध्ये 66 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 613 धावाही केल्या. घुडघ्याच्या दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर जडेजाने 2023 वर्षात शानदार कामगिरी केली.

पॅट कमिन्स आणि ट्रेविस हेड यांच्यासाठीही 2023 वर्ष शानदार राहिले. कमिन्सने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून कसोटी चॅम्पियनशीप जिंकली, तसेच वर्ल्डकप 2023 स्पर्धाही जिंकली.

विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळताना ट्रेविस हेडने शतके साजरी केली आणि सामनावीर पुरस्कार जिंकला. कमिन्सने 2023 वर्षात 24 सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतल्या, तर 422 धावाही केल्या. तसेच हेडने 31 सामन्यांमध्ये 1698 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या.

सर्वोत्तम महिला खेळाडूंसाठी नामांकन

आयसीसीकडून रेचल हेहोए फ्लिंट ट्रॉफी वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूला देण्यात येते. या पुरस्कारासाठी श्रीलंकेच्या चामरी अटापट्टू, इंग्लंडच्या नतालिया सायव्हर-ब्रंट आणि ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले गार्डनर व बेथ मुनी यांना नामांकन मिळाले आहे. या चौघींनीही 2023 वर्षात शानदार कामगिरी केली आहे.

अटापट्टूने 2023 वर्षात 24 सामने खेळले, ज्यात 885 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर तिच्या नेतृत्वाखाली श्रीलंका महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकही जिंकले. नतालियाने 2023 वर्षात 18 सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी 894 धावा ठोकल्या, तर 9 विकेट्सही घेतल्या.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने यंदा 2023 टी20 वर्ल्डकप जिंकला, ज्यात बेथ मूनी आणि ऍश्ले गार्डनरची कामगिरीही महत्त्वाची ठरली. ऍश्ले गार्डनरने 2023 वर्षात 29 सामन्यांमध्ये 58 विकेट्स घेण्याबरोबरच 481 धावाही ठोकल्या. बेथ मूनीने 2023 वर्षात 29 सामन्यांमध्ये 1040 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT