द्रविडने एनसीए क्रिकेट प्रमुख पदासाठी केलेल्या अर्जामुळे तो प्रशिक्षक पदाच्या रेसमधून बाहेर (Out of the race for the coaching job) पडला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या रेसमधून राहुल द्रविड बाहेर

द्रविडने एनसीएसाठी (NCA) अर्ज केला आहे. त्याला या पदावर कायम राहायचे आहे. त्याने इंडिया ए क्रिकेटपटूंसोबत उत्तम कामगिरी केली आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स बनण्यासाठी एनसीएचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्याने चांगेल काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने (Former cricketer Rahul Dravid) पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) क्रिकेट प्रमुखपदासाठी अर्ज केला आहे. त्याला टीम इंडियाचे प्रशिक्षक (Coach of Team India) व्हायचे नाही. बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मध्यामाला दिलेल्या माहितीनुसार, याची पुष्टी करण्यात आली आहे. द्रविडने एनसीए क्रिकेट प्रमुख पदासाठी केलेल्या अर्जामुळे तो प्रशिक्षक पदाच्या रेसमधून बाहेर (Out of the race for the coaching job) पडला आहे.

बीसीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, द्रविडने एनसीएसाठी अर्ज केला आहे. त्याला या पदावर कायम राहायचे आहे. त्याने इंडिया ए क्रिकेटपटूंसोबत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने भारतीय संघासाठी एक उत्तम खेळाडूंचे पर्याय तयार केले आहे. हे काम त्याला चालू ठेवायचे आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) द्रविडचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अर्ज मागवले होते. नवीन घटनेनुसार करारात मुदतवाढीची तरतूद नाही आणि निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे.

तत्पूर्वी, बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने पुन्हा एकदा क्रिकेट प्रमुखपदासाठी अर्ज केला आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स बनण्यासाठी एनसीएचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्याने चांगेल काम केले आहे. त्यामुळे तो या पदावर कायम राहू शकतो.

द्रविड शिवाय या पदासाठी इतर कोणाचाही अर्ज नाही

पीटीआयच्या माहितीनुसार, आतापर्यंत राहुल द्रविड शिवाय इतर कोणत्याही खेळाडूचा अर्ज या पदासाठी आलेला नाही. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बीसीसीआयने अर्ज सादर करण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील समोर येत आहे. बीसीसीआयने 15 ऑगस्टपासून काही दिवसांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल द्रविडने या पदासाठी अर्ज केल्याचे सर्वांना माहित असल्याने या पदासाठी अर्ज करण्यात कोणीही फारसे इच्छुक दिसत नाही. त्यामुळे आता ही फक्त एक औपचारिकता आहे. तरी निष्पक्ष असणे गरजेचे आहे. म्हणूनच जर कोणाला वाटत असेल की त्याला/तिला या पदासाठी हक्क सांगायचा असेल तर बीसीसीआयने त्याला आणखी काही दिवस दिले आहेत.

श्रीलंका दौऱ्यानंतर द्रविडने भारतीय संघासोबत पूर्णवेळ भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याचा अर्ज मात्र याची पुष्टी करतो की त्याला अजूनही युवा क्रिकेटपटूंसोबत काम करून राष्ट्रीय क्रिकेट संघाला मदत करायची आहे.

दरम्यान, दुखापतींशी झुंज देत असलेला वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नगरकोटी पुन्हा एकदा NCA मध्ये पोहोचले आहेत. शुभमन गिल देखील NCA मध्ये आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे हे तीनही खेळाडूंचे पुर्नआगमन आणि फिटनेस चाचणी करण्यात येईल. या आधारावर ते इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतील की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एनसीएने त्याला फिटनेस प्रमाणपत्र दिल्यानंतर तो आयपीएलसाठी केकेआर संघात यूएईला जाईल. गिल अजूनही येथे प्रशिक्षण घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT