Saina Nehwal

 

Dainik Gomantak 

क्रीडा

'पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास...: सायना नेहवाल

पंतप्रधानांच्या (Prime Minister) सुरक्षेशी तडजोड झाल्यास कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करु शकत नाही.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील रॅली बुधवारी सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली. रस्त्याने रॅलीच्या ठिकाणी जाणारे पंतप्रधान सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. निवडणुकीच्या रॅलीत सुरक्षेतील त्रुटीचे केंद्र-राज्य भांडणात रुपांतर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बंगालच्या निवडणुकीतही हे दिसून आले.

भारताची आघाडी टेनिसपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) ट्वीट करत म्हटलं, पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. पंतप्रधान मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

बंगालमध्ये नड्डा यांच्या रॅलीवरुन वाद सुरु झाला

10 डिसेंबर 2020 रोजी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या रॅलीमध्येही असाच वाद झाला होता. त्यावेळी बंगालमध्ये निवडणुका जाहीर होणार होत्या. रॅलीपूर्वी भाजपने टीएमसीवर भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणीही केंद्रीय गृहमंत्रालयाने भाजप अध्यक्षांच्या सुरक्षेत कुचराई केल्याबद्दल राज्य सरकारकडून उत्तर मागितले होते. त्याचवेळी टीएमसीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला

गृह मंत्रालयाने म्हटलयं की, आम्ही या गंभीर सुरक्षा त्रुटीची दखल घेत आहोत. तसेच राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करुन कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. त्याचवेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पंजाबसाठी हजारो कोटींचे विकास प्रकल्प सुरु करण्यासाठी पंतप्रधानांच्या दौऱ्यात व्यत्यय आला. लोकांना रॅलीत येण्यापासून रोखण्याच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री चन्नी यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT