Neymar Jr
Neymar Jr Dainik Gomantak
क्रीडा

Neymar Jr ची झाली सर्जरी! PSG कडून महत्त्वपूर्ण अपडेट्स, पण कमबॅकबद्दल मात्र...

Pranali Kodre

Neymar Jr. successful ankle Surgery: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार ज्यूनियर कधी मैदानातील कामगिरीमुळे, तर कधी मैदानाबाहेरील गोष्टींमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत राहात असतो.आता नुकतीच त्याच्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्या उजव्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

सध्या पॅरिस सेंट - जर्मेन क्लबकडून (PSG) खेळणारा नेमार गेल्या महिन्यात लिले ओएससी क्लबविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर न्यावे लागले होते. या सामन्यात पीएसजीने 4-3 अशा फरकाने विजय मिळवला होता.

या सामन्यानंतर आता शुक्रवारी (10 मार्च) नेमारच्या उजव्या घोट्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीएसजीने त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देतामा सांगितले की 'नेमार ज्यूनियरवर शुक्रवारी सकाळी दोहामधील अपसेटर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.आता तो आराम आणि उपचाराच्या प्रोटोकॉलचे पालन करेल.'

दरम्यान, यापूर्वी पीएसजीने स्पष्ट केले होते की नेमार चालू हंगामातील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. तो दुखापतीनंतर शस्त्रक्रियेपूर्वी देखील ३ सामन्यांना मुकला होता. पण आता तो कधी पुनरागमन करणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. नेमारला यापूर्वी 2018 मध्ये देखील याच घोट्याला दुखापत झाली होती.

नेमारने लीग-1 मध्ये या हंगामात 13 गोल्स केले आहेत आणि 11 असिस्ट केले आहेत. या हंगामात पीएसजी लीग-1मध्ये अव्वल क्रमांकावर आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2017 साली पीएसजीने नेमारबरोबर 222 मिलियन युरोजचा करार केल्यापासून नेमारची तंदुरुस्ती नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. तो गेल्या काही काळात अनेकदा दुखापतग्रस्त झाला आहे. तो संघात सामील झाल्यापासून पीएसजीकडून आत्तापर्यंत लीग-1 मध्ये खेळलेल्या 228 सामन्यांपैकी केवळ 112 सामन्यांमध्ये खेळला आहे.

पीएसजीचा पुढील सामना आता रविवारी (19 मार्च) स्टेड रेने एफसीविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT