New Zealand
New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: टी20 मालिकेसाठी किवी संघ जाहीर, विलियम्सनऐवजी 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची धूरा

Pranali Kodre

न्यूझीलंड क्रिकेट संघ जानेवारी 2023 महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला तीन वनडे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडने यापूर्वीच संघ जाहीर केला आहे. पण गुरुवारी त्यांनी टी20 मालिकेसाठीही संघाची घोषणा केली आहे.

न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या टी20 संघाचे कर्णधारपद मिशेल सँटेनरकडे देण्यात आले आहे. केन विलियम्सन आणि टीम साऊथी या दोघांचाही भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघात समावेश नाही.

दरम्यान, न्यूझीलंडच्या टी20 संघात डावखरी मध्यमगती गोलंदाज बेन लिस्टरलाही पहिल्यांदा संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला पदार्पणाची संधी असेल. लिस्टरने ऑकलंड संघाकडून चांगला खेळ केला आहे. त्यामुळे त्याची कामगिरी पाहून त्याला संधी देण्यात आली आहे.

तसेच न्यूझीलंड संघात मिशेल ब्रासवेल, मार्क चापमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, इश सोधी हे खेळाडू कायम आहेत. पण या टी20 मालिकेसाठी काईल जेमिसन, बेन सिअर्स, मॅट हेन्री आणि ऍडम मिलने यांचा दुखापतीमुळे विचार करण्यात आलेला नाही.

न्यूझीलंडचा भारत दौरा वनडे मालिकेने सुरू होईल. त्यानंतर टी20 मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेला १८ जानेवारीला सुरुवात होईल. 18 जानेवारीला पहिला वनडे सामना हैदराबादला, दुसरा वनडे 21 जानेवारीला रायपूरला आणि तिसरा वनडे सामना 24 जानेवारीला इंदोरला होणार आहे.

त्यानंतर 27 जानेवारीला टी20 मालिकेला सुरु होईल. पहिला टी20 सामना रांचीला होणार आहे. त्यानंतर 29 जानेवारीला लखनऊला दुसरा टी20 सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा टी20 सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादला होणार आहे.

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ

टी20 संघ - मिशेल सँटेनर (कर्णधार), फिन ऍलेन, मायकल ब्रासवेल, मार्क चापमन, डेन क्लेव्हर, डेवॉन कॉनवे, जेकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकल रिपॉन, हेन्री शिप्ली, इश सोधी, ब्लेअर टिकनर.

वनडे संघ - टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलेन, मायकल ब्रासवेल, मार्क चापमन, डेवॉन कॉनवे, जेकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ऍडम मिलने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, हेन्री शिप्ली, इश सोधी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT