Amy Satterthwaite  Dainik Gomantak
क्रीडा

न्यूझीलंडची स्टार महिला क्रिकेटर एमी सॅटरथवेटने निवृत्ती केली जाहीर

न्यूझीलंड महिला संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटपटू एमी सॅटरथवेटने (Amy Satterthwaite) गुरुवारी (२६ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

दैनिक गोमन्तक

न्यूझीलंड महिला संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारी क्रिकेटपटू एमी सॅटरथवेटने गुरुवारी (२६ मे) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एमी सॅटरथवेटला 2022-23 हंगामासाठी केंद्रीय कराराची ऑफर देण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही एमी सॅटरथवेटच्या निवृत्तीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, सॅटरथवेटने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, जेव्हा ती T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी आली होती. दोन दिवसांनंतर एमी सॅटरथवेटने त्याच संघाविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होऊनही तिने आपल्या कारकिर्दीत सात शतकांसह एकूण 4639 धावा केल्या.

एवढंच नाही तर, वुमेन्स वनडे क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावण्याचा विक्रम एमी सॅटरथवेटच्या नावावर आहे. T20 क्रिकेटमध्ये तिच्या बॅटमधून 1784 धावा आल्या. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) 26 विकेट्स घेतल्या आहेत. एका T20 सामन्यात तिने 17 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT