Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

Kane Williamson: द्विशतक एक रेकॉर्ड्स अनेक! विलियम्सनचा डबल धमाका ठरला ऐतिहासिक

New Zealand vs Sri Lanka: दुसऱ्या कसोटीत केन विलियम्सनने द्विशतक साजरं करत सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

Pranali Kodre

Kane Williamson slams 6th Double Century in Test: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघा शुक्रवारपासून वेलिंग्टनमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सनने दमदार कामगिरी करत द्विशतक ठोकले आहे.

त्याने या सामन्यात 296 चेंडूत 215 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याचे हे द्विशतक विक्रमी ठरले आहे. हे द्विशतक करत असताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

केन विलियम्सनचे हे कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक ठरले आहे. त्यामुळे तो सर्वाधिक कसोटी शतके करणाच्या यादीत विराट कोहली, मायकल क्लार्क, हाशिम अमला यांच्यासह संयुक्तरित्य 17 व्या क्रमांकावर आला आहे. या तिघांनीही कसोटीत 28 शतके केली आहेत.

त्याचबरोबर विलियम्सनने कसोटी कारकिर्दीत सहाव्यांदा 200 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कसोटीत 6 द्विशतके करणारा 13 वा खेळाडू ठरला असून सर्वाधिक कसोटी द्विशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, मार्वन अटापट्टू,विरेंद्र सेहवाग,जावेद मियाँदाद आणि युनूस खान यांची बरोबरी केली आहे. या खेळाडूंनीही कसोटीत प्रत्येकी 6 द्विशतके केली आहेत.

या यादीत 12 द्विशतकांसह डॉन ब्रॅडमन अव्वल क्रमांकावर असून कुमार संगकाराने 11 द्विशतके केली आहेत. त्यापाठोपाठ 9 द्विशतकांसह ब्रायन लारा आहे, तर 7 द्विशतके विराट कोहली, वॉल्टर हेमंड, माहेला जयवर्धने यांच्या नावावर आहेत.

तसेच विलियम्सनचे हे कसोटीतील सलग तिसरे शतक आहे. त्याने सलग तीन सामन्यांमध्ये शतक करण्याचा दुसऱ्यांदा कारनामा केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीतही आणि त्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीतही शतक केले होते.

त्याने यापूर्वी डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान देखील सलग तीन कसोटीत तीन शतके करण्याचा कारनामा केला होता. त्यामुळे दोन वेळा हा कारनामा करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा फलंदाज आहे.

इतकेच नाही, तर या खेळीदरम्यान विलियम्सनने कसोटी कारकिर्दीत 8000 धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे तो हा विक्रम करणाराही न्यूझीलंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर आता 28 शतकांसह कसोटीत 94 सामन्यांतील 164 डावांमध्ये 8124 धावा नोंदवल्या गेल्या आहेत.

हेन्री निकोल्सचेही द्विशतक

दरम्यान, सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत विलियम्सनबरोबर हेन्री निकोल्सनेही नाबाद द्विशतकी खेळी साकारली आहे. त्याने 240 चेंडूत नाबाद 200 धावा केल्या. त्याने आणि विलियम्सनने तिसऱ्या विकेटसाठी 363 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे न्यूझीलंडने पहिला डाव 123 षटकात 4 बाद 580 धावा करत घोषित केला आहे. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाखेर 17 षटकात 2 बाद 26 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT