New Zealand  Dainik Gomantak
क्रीडा

NZ Vs BAN: तब्बल 10 वर्षानंतर न्यूझीलंड संघाची बांगलादेश वारी, भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी...

NZ Vs BAN: न्यूझीलंडचा संघ सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी दहा वर्षांत प्रथमच बांगलादेशचा दौरा करणार आहे.

Manish Jadhav

NZ Vs BAN: न्यूझीलंडचा संघ सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी दहा वर्षांत प्रथमच बांगलादेशचा दौरा करणार आहे.

यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका महत्त्वाची ठरणार आहे. अहमदाबादमध्ये उपविजेता न्यूझीलंड आणि गतविजेता इंग्लंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे.

दरम्यान, बांगलादेशचा (Bangladesh) विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तानशी 7 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हा दौरा 21 सप्टेंबरपासून सुरु होईल.

तिन्ही सामने 21, 23 आणि 26 सप्टेंबर रोजी मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. नोव्हेंबरच्या अखेरीस विश्वचषकानंतर कसोटी मालिका सुरु होईल.

पहिला सामना 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आणि दुसरा सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल, ज्याचे यजमान शहर नंतर जाहीर केले जाईल.

दुसरीकडे, न्यूझीलंडने पूर्ण मालिकेसाठी 2013 मध्ये बांगलादेशचा शेवटचा दौरा केला होता, यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित राहिली होती, तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका बांगलादेशने 3-0 ने जिंकली होती.

न्यूझीलंड (New Zealand) संघाने एक टी-20 सामना जिंकला होता. न्यूझीलंड संघाला भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी बांगलादेशमध्ये वनडे मालिका खेळण्याचा फायदा होणार आहे.

दोन्ही ठिकाणच्या खेळपट्ट्यांमध्ये फारसा फरक नसल्याने न्यूझीलंडला विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT