New Zealand Legends Suzie Bates, Sophie Devine & Lea Tahuhu Retire Dainik Gomantak
क्रीडा

Cricket Retirement: क्रिडाविश्वात खळबळ! विश्वचषकातून बाहेर पडताच 3 दिग्गज खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

New Zealand Women’s Team: महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्याने संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

Sameer Amunekar

महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्याने संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. इंग्लंडविरुद्धचा सामना हा न्यूझीलंडचा या स्पर्धेतील अखेरचा सामना ठरला. या पराभवानंतर संघातील तीन अनुभवी आणि यशस्वी महिला क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती घेतली. त्यांच्या निरोपावेळी मैदानावर अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले.

'गार्ड ऑफ ऑनर' देत गौरवपूर्ण निरोप

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सूजी बेट्स, सोफी डिवाइन आणि ली ताहूहू यांनी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा शेवट झाला. सामना संपताच दोन्ही संघांतील खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी मैदानावर 'गार्ड ऑफ ऑनर' देत या तिघींना सन्मानपूर्वक निरोप दिला. स्टेडियममधील चाहत्यांनीही उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

न्यूझीलंड क्रिकेटच्या सुवर्णकाळातील तीन आधारस्तंभ

सूजी बेट्स या न्यूझीलंड महिला क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरल्या आहेत. एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मिळून त्यांनी 370 सामने खेळत 10,566 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाज म्हणूनही 145 विकेट्स घेत त्यांनी अष्टपैलू कामगिरीची छाप सोडली.

सोफी डिवाइन यांनी 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 8,096 धावा करत 227 विकेट्स मिळवल्या. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात त्यांनी अनेकदा न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. तर अनुभवी वेगवान गोलंदाज ली ताहूहू यांनी 207 सामन्यांत 225 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या सर्वाधिक यशस्वी महिला गोलंदाजांमध्ये आपले स्थान पक्के केले.

संघासाठी मोठी पोकळी

या तिन्ही खेळाडूंनी अनेक वर्षे न्यूझीलंड महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निवृत्तीमुळे संघात अनुभवाची मोठी कमतरता जाणवणार आहे. आगामी काळात युवा खेळाडूंवर ही जबाबदारी येणार असून संघाला नव्या नेतृत्वाखाली स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान असेल.

फ्रँचायझी क्रिकेटमध्ये कायम दिसणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असला तरी सूजी बेट्स, सोफी डिवाइन आणि ली ताहूहू या तिघींचा क्रिकेटशी संबंध संपणार नाही. त्या विविध देशांतील फ्रँचायझी लीगमध्ये खेळणे सुरू ठेवणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना त्यांचा खेळ पाहण्याची संधी पुढेही मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT