Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 मुळे न्यूझीलंडचा घोळ! कर्णधाराचंच वर्ल्डकप खेळणं झालं महाकठीण

आयपीएलमध्ये बाऊंड्री रोखण्याचा प्रयत्न विलियम्सनच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

Pranali Kodre

Kane Williamson Set to miss World Cup 2023: न्यूझीलंडचा वनडे कर्णधार केन विलियम्सन आगामी वनडे वर्ल्डकप खेळणे अवघड झाले आहे. त्याला 31 मार्चला आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना दुखापत झाली आहे.

गुजरातने पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला होता. या सामन्यातील 13 व्या षटकात सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने मारलेल्या मोठ्या फटक्यावर चेंडूला सीमापार जाण्यापासून रोखताना जखमी झाला होता. चेंडू आडवताना तो त्याच्या उजव्या गुडघ्यावर पडल्याने त्याचा गुडघा दुखावला गेला.

त्यामुळे त्याच्यावर लगेचच मैदानावर उपचार करण्यात आले होते. पण त्याला नीट चालताही येत नसल्याने तो मेडिकल स्टाफच्या मदतीने मैदानातून बाहेर गेला. त्यानंतर तो मैदानात उतरला नाही. त्याला गुजरातने आयपीएल 2023 लिलावातून हार्दिक पंड्या कर्णधार असेलल्या गुजरात टायटन्स संघाने 2 कोटी रुपयांच्या त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते.

विलियम्सनला करावी लागणार शस्त्रक्रिया

विलियम्सनला गुडघ्याला आता गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. तसेच तो पुढील उपचारासाठी मायदेशी परतला आहे. त्याचबरोबर आता असेही समोर आले आहे की त्याच्या गुडघ्याच्या आजूबाजूला असलेली सुज उतरल्यानंतर पुढील तीन आठवड्याच्या कालावधीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले की 'तो वर्ल्डकपसाठी तयार असेल, अशी आशा आम्ही सोडलेली नाही. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य वाटत नाहीये. आत्ता सध्या आम्ही केनबरोबर आहोत. हा त्याच्यासाठी कठीण काळ आहे. ही अशी दुखापत आहे, ज्याची तुम्ही अपेक्षा केलेली नसते. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतो.'

विलियम्सन याने सांगितले आहे की 'अशी दुखापत होणे निराशाजनक आहे. पण माझे लक्ष्य आता शस्त्रक्रिया करण्यावर आहे. यामुळे थोडा वेळ लागेल. पण मी लवकरात लवकर मैदानात परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.'

विलियम्सन जर यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या वर्ल्डकपला मुकला, तर न्यूझीलंडसाठी तो मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करू शकतो.

न्यूझीलंड संघ सोडून आयपीएलसाठी आला होता

खरंतर विलियम्सनला आयपीएलसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मुक्त केले होते. सध्या न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहेत. तसेच मे महिन्यात न्यूझीलंड पाकिस्तान दौऱ्यावर 5 वनडे आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. पण या सर्व मालिकांमधून विश्रांती घेत विलियम्सनने आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र आता त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासूनच दूर राहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT