Shreyas Iyer - Virat Kohli BCCI
क्रीडा

World Cup 2023: विराट-श्रेयसचे शानदार शतक! सलग तिसऱ्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडला 398 धावांचे आव्हान

India vs New Zealand Semi-Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. जर हा सामना न्यूझीलंडने जिंकला, तर ते सलग तिसऱ्यांना वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहचतील, तर जर भारताने हा सामना जिंकला, तर भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यात पोहचेल.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही चांगली सुरुवात करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावांवर बाद झाला.

मात्र, त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डाव सांभाळायला सुरुवात केली. पण गिल 79 धावांवर असताना त्याला उष्णतेचा त्रास झाल्याने तो रिटायर्ज हर्ट झाला. त्यामुळे विराटला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर आला. या दोघांनही दमदार खेळ करत जोरदार फटकेबाजी केली.

त्यामुळे या दोघांचेही शतक पूर्ण झाले. विराटने 106 चेंडूत त्याचे शतक केले. पण शतकानंतर तो 117 धावांवर बाद झाला.त्याने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्यानंतर श्रेयसने 67 चेंडूत शतक पूर्ण केले. पण तोही शतक करून बाद झाला. त्याने 70 चेंडूत 105 धावांची खेळी केली.

त्यानंतर अखेरच्या षटकार सूर्यकुमारही 1 धावेवर बाद झाला. त्यामुळे गिल पुन्हा फलंदाजीला आला. अखेर भारताचे षटकात 397 धावा झाल्या. केएल राहुलने नाबाद 39 धावांची खेळी केली. तसेच गिलने 66 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.

न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 3 विकेट्स घेतल्या, तसेच ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT