ICC ODI World Cup 2023, England vs New Zealand:
भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेला गुरुवारपासून (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात खेळवण्यात येत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 282 धावा केल्या.
इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान हे सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी सकारात्मक सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मलान 14 धावांवर बाद झाला. पाठोपाठ बेअरस्टो 33 धावांवर बाद झाला.
नंतर हॅरी ब्रुकनेही आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण तोही 16 चेंडू 16 धावांवर बाद झाला. त्याला रचिन रविंद्रने बाद केले. पाठोपाठ ग्लेन फिलिप्सने मोईन अलीला 11 धावांवर बाद केले.
यानंतर मात्र जो रुट आणि कर्णधार जॉस बटलरची जोडी जमली. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. मात्र, या दोघांची जोडी धोकादायक ठरत असतानाच मॅट हेन्रीने बटलरला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बटलर 43 धावांवर बाद झाला.
त्यानंतर लिव्हिंगस्टोनने अर्धशतकी खेळी केलेल्या जो रुटला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही फार काळ टिकू शकला नाही. त्याला बोल्टने 20 धावांवरच माघारी धाडले. यानंतर 42 व्या षटकात एक बाजू भक्कमपणे सांभाळणाऱ्या जो रुटचा अडथळा ग्लेन फिलिप्सने दूर केला.त्याने त्याला त्रिफळाचीत केले. रुटने 86 चेंडूत 77 धावांची खेळी केली.
सॅम करन (14) आणि ख्रिस वोक्सही (11) झटपट बाद झाले. अखेरीस आदिल राशिद आणि मार्क वूड यांनी इंग्लंडला 280 धावांचा टप्पा पार करून दिला. राशिद 15 धावांवर आणि वूड 13 धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रचिन रविंद्र आणि ट्रेंट बोल्ट यांनी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.