Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

NZ vs SA: केन विलियम्सनचं तूफान, झळकावले 32 वे कसोटी शतक; सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा रेकॉर्ड मोडला

Kane Williamson Record New Zealand vs South Africa: न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि त्यांचा माजी कर्णधार केन विल्यमसन यांच्यासाठी आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाणारा दिवस ठरला आहे.

Manish Jadhav

Kane Williamson Record New Zealand vs South Africa:

न्यूझीलंड क्रिकेट संघ आणि त्यांचा माजी कर्णधार केन विल्यमसन यांच्यासाठी आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाणारा दिवस ठरला आहे. न्यूझीलंडने आज दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव करत मालिका खिशात घातली. केन विल्यमसनबद्दल (Kane Williamson) बोलायचे झाल्यास, त्याने आणखी एक शतक झळकावले. गेल्या काही सामन्यांपासून केन जबरदस्त फॉर्म दिसत आहे. तो सातत्याने शानदार शतके झळकावत आहे.

न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप केले

दरम्यान, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ 2 कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडला पोहोचला तेव्हा बहुतेक खेळाडूंचा संघात नव्याने समावेश करण्यात आला होता, कारण पहिल्या कसोटीच्या वेळी दक्षिण आफ्रिकेची स्वतःची T20 लीग म्हणजेच SA20 खेळली जात होती. सर्व अनुभवी खेळाडू यात व्यस्त होते आणि नवीन खेळाडूंची फौज तयार करुन कसोटी मालिकेसाठी पाठवण्यात आली होती.

याचा पुरेपूर फायदा घेत न्यूझीलंडने पहिला सामना 281 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर दुसऱ्या सामन्याची पाळी आली. यावेळीही न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला, कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ नवीन खेळाडूंनी भरलेला होता.

दुसरीकडे, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ गेल्या 92 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. पण याआधी न्यूझीलंड संघाला दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका जिंकण्यात यश आले नव्हते. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ जिंकलेच नाही तर दक्षिण आफ्रिकेचाही पूर्ण सफाया केला. म्हणजेच जे 92 वर्षात कधीच होऊ शकले नाही ते आता घडले आहे.

केन विल्यमसनने अप्रतिम खेळी खेळली, आणखी एक शतक झळकावले

दरम्यान, या मालिकेत केन विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार नव्हता. टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली केन फलंदाज म्हणून खेळत होता. पण एक फलंदाज म्हणून केन विल्यमसनने भरपूर धावा केल्या आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

यासह तो कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या युनूस खानच्या बरोबरीने पोहोचला आहे. युनूस खाननेही कसोटी कारकिर्दीतील चौथ्या डावात 5 शतके झळकावली आहेत. चौथ्या डावात 4 शतके झळकावणारे अनेक फलंदाज आहेत, यामध्ये भारताचे सुनील गावस्कर, रिकी पाँटिंग, रामनरेश सरवन आणि ग्रॅमी स्मिथ यांच्या नावांचा समावेश आहे.

केनने स्टीव्ह स्मिथला मागे टाकले

सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत केन विल्यमसनने आता स्टीव्ह स्मिथला मागे टाकले असून तो आता पाचव्या स्थानावर आला आहे. या यादीत पहिले नाव विराट कोहलीचे आहे, त्याच्या नावावर 80 शतके आहेत. डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर असून त्याने 49 शतके झळकावली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने आतापर्यंत 47 शतके झळकावली आहेत. जो रुटची आता 47 शतके आणि केन विल्यमसनची 45 शतके आहेत, तर स्टीव्ह स्मिथची 44 शतके आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT