Kane Williamson AFP
क्रीडा

Kane Williamson: आक्रमक फलंदाजी करत असतानाच विलियम्सनने अचानक का सोडले मैदान? वाचा कारण

New Zealand vs Pakistan: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात केन विलियम्सनला फलंदाजी करत असतानाच अचानक मैदानातून बाहेर जावे लागले होते.

Pranali Kodre

New Zealand captain Kane Williamson retired hurt in 2nd T20I against Pakistan:

रविवारी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टनला पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयात फिन ऍलेनने आक्रमक फटकेबाजी करत मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असला, तरी त्यांना मोठा धक्का बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला फलंदाजी करताना अचानक मैदानातून बाहेर जावे लागले. त्याला अचानक उजव्या हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागल्याने मैदानातून बाहेर जावे लागले.

झाले असे की या सामन्यात न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी विलियम्सन 6 व्या षटकात डेवॉन कॉनवे बाद झाल्यानंतर मैदानात उतरला. तो दमदार फलंदाजी करत असतानाच 10व्या षटकानंतर विलियम्सनने फिजिओला मैदानात बोलावले. पण तो लगेचच रिटायर्ड हर्ट होत मैदानातून बाहेर गेला.

त्याच्या जागेवर डॅरिल मिचेल फलंदाजीला आला. नंतर न्यूझीलंड क्रिकेटकडून सांगण्यात आले की विलियम्सन उर्वरित सामन्यात खबरदारी म्हणून सहभागी होणार नाही. 10 व्या षटकात धाव पूर्ण करत असताना त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला असून तो रिटायर्ड हर्ट झाला आहे.

विलियम्सन मैदानातून बाहेर गेला, तेव्हा तो 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावांवर खेळत होता. तो सामन्यातून बाहेर झाल्याने टीम साऊदीने प्रभारी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली.

दरम्यान, नंतर ऍलेनने एका हाजूने आपला खेळ कायम केला होता. मात्र, त्याला 13 व्या षटकात उसमा मीरने बाद केले. ऍलेनने 41 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावांवर बाद केले.

त्याच्यानंतर केवळ सँटेनरला 20 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 13 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 194 धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तनला 19.3 षटकाच सर्वबाद 173 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने 43 चेंडूत सर्वाधिक 66 धावांची खेळी केली, तसेच फखर जमानने 25 चेंडूत 50 धावा केल्या.

मात्र त्यांना पाकिस्तानला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. त्यांच्याशिवाय पाकिस्तानकडून केवळ कर्णधार शाहिन आफ्रिदीने दोन आकडी धावसंख्या पार केली. त्याने 22 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून ऍडम मिलनेने 4 विकेट्स घेतल्या. तसेच टीम साऊदी, बेन सिअर्स आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT