Neil Wagner Retirement X/ICC
क्रीडा

Neil Wagner: 'पुढे तुझा विचार होणार नाही...', निवड समितीने कळवताच दिग्गज गोलंदाजाचा भरल्या डोळ्यांनी क्रिकेटला निरोप

New Zealand Bowler Neil Wagner Retirement: न्यूझीलंडच्या आग ओकणारा गोलंदाज अखेर थांबला, भरलेल्या डोळ्यांनी घेतला क्रिकेटचा निरोप

Pranali Kodre

Neil Wagner has announced his retirement from international cricket:

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज नील वॅगनरने अचानक मंगळवारी (27 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारपासून न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. पण या मालिकेसाठी त्याचा विचार करण्यात येणार नसल्याचे न्यूझीलंडच्या निवडकर्त्यांनी त्याला सांगितले होते. त्यामुळे त्याने आंतररष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

37 वर्षीय वॅगनरचे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांच्याशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेल्या आठवड्यात मिळवलेल्या मालिका विजयानंतर चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी त्याला स्पष्ट केले होते की त्याचा भविष्यासाठी आता फार विचार केला जाणार नाही.

दरम्यान, त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत खेळवले जाणार नसले, तरी पहिल्या सामन्याचा भाग होण्यासाठी न्यूझीलंड संघाने आमंत्रण दिले आहे, ज्यामुळे त्याची कारकिर्द साजरी करता येईल.

त्याने मंगळवारी स्टेड यांच्यासह पत्रकार परिषदेत त्याची निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी वॅगनरला त्याचे अश्रू आवरणे कठीण झाले होते. तथापि, वॅगनरने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणे कायम करणार आहे.

त्याने निवृत्तीची घोषणा करताना सांगितले, 'मला माहित होते वेळ जवळ आली आहे. गेल्या आठवड्यात विचार केल्या नंतर आणि भविष्यात पाहिल्यानंतर आणि आगामी कसोटी सामन्यांचा विचार केल्यास, मला वाटते की आता थांबण्याची आणि बाकी खेळाडूंसाठी जागा रिकामी करण्याची वेळ झाली आहे.'

तो म्हणाला, 'हा निर्णय सोपा नव्हता, पण हे भावनिक आहे. ही रोलरकोस्टर राईड आहे. पण मला असे वाटते की आता बॅटन पुढे देण्याची आणि न्यूझीलंडला एका चांगल्या स्थितीत दुसऱ्यांच्या हातात सोपवण्याची वेळ आहे. आशा आहे की ते त्यांचा वारसा पुढे नेतील.'

तसेच संघाने त्याला आमंत्रण दिल्याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'मी येथे नसतो. पण मला वाटते की संघ खूपच चांiला आहे की त्यांनी मला त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी आमंत्रण दिले. त्याबरोबर मी त्यांना या मालिकेच्या तयारीसाठीही मदत करेल. ही खूप छान वागणूक आहे.'

वॅगनरने त्याच्या काही अविस्मरणीय आठवणीही यावेळी सांगितल्या. तसेच त्याने 2021 मध्ये टेस्ट चॅम्पियनशीप जिंकणेही खास असल्याचे सांगितले. वॅगनरने त्याच्या कुटुंबियांचे, मित्रपरिवाराचे, प्रशिक्षकांचे आणि संघसहकाऱ्यांचेही आभार मानले.

दरम्यान, स्टेड यांनीही सांगितले की वॅगनरला तो भविष्यातील योजनेचा भाग नसल्याचे सांगणे कठीण होते. पण त्याने समजून घेतले.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या वॅगनरने त्याच्या कारकिर्दीतील न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने 64 कसोटी सामने खेळताना 26.57 च्या सरासरीने 260 धावा केल्या. त्याने 875 धावाही केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT