New members in FC Goa support staff Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या सपोर्ट स्टाफमध्ये नवे सदस्य

आझकोरा सहाय्यक मार्गदर्शक, तर डोनेज तंदुरुस्तीविषयक प्रशिक्षक

Kishor Petkar

पणजी : एफसी गोवाने मुख्य प्रशिक्षकपदी कार्लोस पेनया यांची नियुक्ती केल्यानंतर, त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये दोघा नव्या स्पॅनिश सदस्यांना सामावून घेतले. गोर्का आझकोरा सहाय्यक मार्गदर्शक, तर होएल डोनेज तंदुरुस्तीविषयक (स्ट्रेंग्थ अँड कडिंशनिंग) प्रशिक्षक असतील.

व्यावसायिक फुटबॉलपटू या नात्याने 14 मोसम खेळल्यानंतर आझकोरा यांनी प्रशिक्षणातील यूईएफए अ परवाना प्राप्त केला. 2018 मध्ये खेळाडू या नात्याने निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ॲथलेटिक बिल्बाओ संघाच्या युवा संघासोबत काम केले. खेळाडू कारकिर्दीत ते पाच ला-लिगा, 116 सेगुंडा विभागीय सामने खेळले. यूईएफए कप (युरोपा लीग) स्पर्धेत खेळण्याचा अनुभवही त्यांच्यापाशी आहे.

तंदुरुस्ती विषयातील डोनेज हे तज्ज्ञ आहेत. त्यांच्यापाशी क्रीडा विज्ञानातील पदवी, तसेच एफसी बार्सिलोनातर्फे सांघिक क्रीडा विभागातील उच्च कार्यक्षमता व्यावसायिक पदव्युत्तर पदवीही आहे. शिवाय ते प्रशिक्षणातील यूईएफए अ परवानाधारक आहेत. स्पेनमध्ये बरीच वर्षे त्यांनी तंदुरुस्तीविषयक प्रशिक्षक म्हणून काम केले असून हाँगकाँग प्रीमियर लीगमधील दोन वर्षांचा अनुभवही त्यांच्यापाशी आहे.

योग्य संघात दाखल होतोय : आझकोरा

‘‘मी बिनचूक वेळेस चांगले लोक (स्टाफ, क्लब कर्मचारी, खेळाडू) असलेल्या योग्य संघात दाखल होत आहे. त्यामुळे गोव्यात दाखल होऊन मोसमपूर्व सुरवात करण्यास उत्सुक आहे. मोसम उल्लेखनीय ठरण्याची मला खात्री आहे,’’ अशी प्रतिक्रिया एफसी गोवाशी करार केल्यानंतर आझकोरा यांनी दिली. ‘‘भरपूर अनुभव गाठीशी असलेले गोर्का पक्के व्यावसायिक आहेत. स्पेनमध्ये ते खूप वर्षे उच्चस्तरीय फुटबॉल खेळले असून नेहमीच अभ्यासूवृत्तीने शिकण्यावर त्यांचा भर असतो,’’ असे पेनया यांनी आपल्या सहाय्यकाविषयी सांगितले.

भारताबद्दल जाणून घेण्यास उत्सुक : डोनेज

‘‘भारत देश, संस्कृती, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि विशेषतः देशातील लोकाबद्दल जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. या अद्‍भूत देशात मला आणि माझ्या कुटुंबास विस्मयकारक अनुभव प्राप्त होण्याची खात्री बाळगतो,’’ असे डोनेज यांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षक पेनया यांनी यापूर्वी डोनेज यांच्यासमवेत काम केले आहे. त्यांच्या क्षेत्रातील ते चाणाक्ष व्यावसायिक आहेत. परिपूर्ण असलेले डोनेज खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढवतील, असा विश्वास पेनया यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT