Netherlands vs Ecuador Dainik Gomantak
क्रीडा

Netherlands vs Ecuador: नेदरलँड-इक्वाडोर सामना बरोबरीत

दोन्ही संघांकडून प्रत्येक एक गोल; नेदरलँडच्या गॅक्पोने नोंदवला स्पर्धेतील दुसरा वैयक्तिक गोल

Akshay Nirmale

Netherlands vs Ecuador: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत शुक्रवारी ग्रुप ए मधील नेदरलँड-इक्वाडोर सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. सामन्याच्या सुरवातीलाच नेदरलँडने गोल नोंदवून आघाडी घेतली होती. त्यानंतर सेकंडहाफचा खेळ सुरू झाल्यावर या गोलची परतफेड इक्वाडोर संघाने केली. (FIFA World Cup 2022)

दोहातील खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना झाला. पुर्णवेळेत आणि त्यानंतर भरपाई वेळेतही ही बरोबरी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

नेदरलँडने यापुर्वी एक विजय मिळवला होता. त्या सामन्यात नेदरलँडने सेनेगल संघाला पराभतू केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे आधीच तीन गुण होते. इक्वाडोरविरूद्धच्या बरोबरीने त्यांना एक गुण मिळाला आहे. या विजयाने यजमान कतार संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

विशेष म्हणजे सुरवातीच्या काळात या सामन्यावर इक्वाडोरने नियंत्रण राखले होते. तथापि, गोल करण्यात इक्वाडोरच्या खेळाडुंना यश आले नाही. सुरवातीच्या अर्धातासातच नेदरलँडने 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला नेदरलँडच्या कोडी गॅक्पो याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. डेवी क्लासेन याने दिलेल्या पासवर त्याने अजिबात चूक केली नाही. गॅक्पो याचा हा स्पर्धेतील दुसरा गोल आहे.

तथापि, इक्वाडोरने नेदरलँडला खूप सतावले. त्यांची चेंडुवरील हुकुमत, पासेस आणि शॉट्स नेदरलँडच्या तुलनेत अधिक होते. उत्तरार्धाच्या खेळाला सुरवात होताच 49 व्या मिनिटाला इक्वाडोरचा कर्णधार एन्नर व्हेलेन्सिया याने मैदानी गोल नोंदवत इक्वाडोरला बरोबरी साधून दिली.

दरम्यन, फिफा रँकिंगमध्ये नेदरलँड 8 व्या स्थानावर आहे तर इक्वाडोर 44 व्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT