Nepal and Oman ICC
क्रीडा

T20 World Cup 2024 स्पर्धेसाठी अठरा संघ निश्चित! नेपाळ-ओमाननेही मिळवली पात्रता

Pranali Kodre

Nepal and Oman qualify for Men's T20 Cricket World Cup 2024 :

कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेत पुढीलवर्षी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. हे टी२० वर्ल्डकपचे नववे पर्व असणार आहे. विशेष म्हणजे 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेसाठी गेल्या काही काळापासून पात्रता फेरीच्या स्पर्धा विविध भागात सुरू आहेत. आता नुकतेच नेपाळ आणि ओमान या दोन संघांनी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

आशिया क्वालिफायर्स स्पर्धेत नेपाळने संयुक्त अरब अमिरातीला (UAE) उपांत्य फेरीत 8 विकेट्सने पराभूत केले. तसेच ओमानने बहरीनला उपांत्य सामन्यात 10 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे नेपाळ आणि ओमान या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश करण्याबरोबरच टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला आहे.

दरम्यान, वर्ल्डकप खेळण्याचा नेपाळचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. यापूर्वी नेपाळ वर्ल्डकप स्पर्धा खेळलेले नाही. तसेच ओमानही पहिल्या फेरीच्या पुढे कधी वर्ल्डकपमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे नेपाळ आणि ओमान या दोन्ही संघांसाठी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा मोठी संधी असणार आहे.

अशी झाली उपांत्य फेरी

उपांत्य फेरीत युएईने प्रथम फलंदाजी करताना वृत्य अरविंदच्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या होत्या. त्यानंतर 135 धावांचे आव्हान नेपाळने 17.1 षटकात 2 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. नेपाळकडून असिफ शेखने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार रोहित पौडेलने नाबाद 34 धावा केल्या.

गोलंदाजीत नेपाळकडून कौशल मल्लाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच युएईकडून निलांश केसवाणी आणि बासिल हमीद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तसेट बहरीन आणि ओमान संघात झालेल्या उपांत्य सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बहरीनने प्रथम फंलंदाजी करताना 9 बाद 106 धावा केल्या होत्या. त्याच्याकडून इम्रान अलीने सर्वाधिक 30 धावा केल्या. ओमानकडून गोलंदाजी करताना आकिब इलियासने 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 107 धावांचे आव्हान ओमानने 14.2 षटकात एकही विकेट न गमावता सहजच पूर्ण केले.

आठरा संघ निश्चित

जून 2024 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिले 8 संघ म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याबरोबरच टी20 क्रमवारीत पहिल्या 10 संघांमध्ये असेलल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना थेट पात्रता मिळाली आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यजमान असल्याने त्यांनाही थेट पात्रता मिळाली आहे. याशिवाय पापुआ न्यू गिनी (PNG) संघाने इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफिकेशनमधून पात्रता मिळवली आहे, तर आयर्लंड आणि स्कॉटलंड युरोप रिजन क्वालिफायरमधून पात्र ठरले आहेत.

आता आशिया क्वालिफिकेशनमधून नेपाळ आणि ओमानने पात्रता मिळवली आहे. त्याचबरोबर अमेरिका क्वालिफिकेशनमधून कॅनडाने पात्रता मिळवली आहे. त्यामुळे एकूण 18 संघ निश्चित झाले आहेत.

आता उर्वरित दोन जागा आफ्रिका क्वालिफायरमधून निश्चित होतील. ही स्पर्धा नोव्हेंबर अखेरीस नामिबियामध्ये खेळवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT