Neeraj Chopra With his parents Twitter/@Neeraj_chopra1
क्रीडा

नीरज चोप्राचे स्वप्न झाले पूर्ण, आई-बाबांसोबत करतोय हवाई सफर

आई-वडीलांना पहिल्यांदा विमानात बसलेले पाहून नीरज खुश

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने भारताचा जगभर गौरव केला. नीरज चोप्रा मूळचा हरियाणा राज्यातील पानिपतचा आहे.

Neeraj Chopra With his parents in airplane

नीरज चोप्राने आपल्या पालकासोबत पहिल्यांदा हवाई प्रवास केला. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

Neeraj Chopra With his parents in airplane

नीरज चोप्रासाठी, 2021 हे वर्ष स्वप्नांना पंख देणारे वर्ष ठरले आहे. पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि आता तो आपल्या बालपणात पाहिलेले पुर्ण करतांना दिसत आहे.

Neeraj Chopra

नीरज चोप्राने त्याच्या पालकांसोबत विमानात प्रवास करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यासोबत त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. "आज माझ्या आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले. माझ्या आई-वडीलांना पहिल्यांदा विमानात बसलेले पाहून मला खुप आनंद झाला. सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन,” असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.

Neeraj Chopra

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव करणारा नीरज चोप्रा एैतीहासिक भुमी पानिपतचा आहे. त्यांचे वडील सतीश कुमार यांचा शेतीचा व्यवसाय आहे तर आई सरोज देवी गृहिणी आहेत.

Neeraj Chopra

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा एकमेव खेळाडू आहे. त्याचबरोबर, नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर एकेरीमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Neeraj Chopra

नीरज चोप्रा सुवर्णपदक जिंकल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधून परत आल्यापासून त्याच्या कमाईतही वाढ झाली आहे. त्यांच्यावर बक्षीस आणि जाहिरातींचा वर्षाव झाला. एका अंदाजानुसार, नीरज प्रत्येक जाहिरातीमधून वर्षाला किमान 15 ते 25 लाख रुपये कमवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT