Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: भारताचा 'गोल्डन बॉय' पुन्हा चमकला! डायमंड लीग जिंकत रचला इतिहास

Lausanne Diamond League: नीरज चोप्राने डायमंड लीगचे विजेतेपद जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.

Pranali Kodre

Neeraj Chopra win Lausanne Diamond League title: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा डायमंड लीगचे विजेतेपद मिळवले आहे. शुक्रवारी (30 जून) लुसेनमध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने 87.66 मीटरचा भाला भेक करत अव्वल क्रमांक मिळवला.

शुक्रवारी नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला. पण नंतर त्याने चांगले पुनरागमन केले आणि दुसऱ्या प्रयत्नात 83.52 मीटर भालाफेक केली. त्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात 85.04 मीटर भाला फेकला. यामुळे तो पहिल्या तीन जणांमध्ये आला होता.

नीरजचा चौथा प्रयत्नही फाऊल झाला. पण पाचव्या प्रयत्नात त्याने 87.66 मीटरचा भाला फेकला, ज्यामुळे त्याला अव्वल क्रमांक मिळाला.

नीरजने जर्मनीच्या जुलीयन वेबरला मागे टाकले. ज्युलीयन वेबरने पहिल्याच प्रयत्नात 86.20 मीटर भाला फेक केली होती. त्यानंतर त्याने अखेरच्या प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला.

नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून सातत्याने त्याची कामगिरी उंचावली आहे. त्याने याचवर्षी दोहामध्ये 88.67 मीटर भालाफेक करत डायमंड लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.

पण, त्यानंतर नीरजला दुखापत झाली होती. पण त्यातून त्याने चांगले पुनरागमन करत लुसेनमध्ये विजेतेपद जिंकले. आता नीरजने लक्ष्य यावर्षी होणाऱ्या एशियन गेम्सवर असणार आहे.

मुरली श्रीशंकर पाचवा

दरम्यान, लुसेन डायमंड लीगमध्ये भारताला खेळाडू मुरली श्रीशंकरही लांब उडी प्रकारात सहभागी झाला होता. पण तो या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहिला. त्याने पहिल्या प्रयत्नात 7.75 मीटर लांब उडी मारली होती.

त्यानंतर त्याने 7.63 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 7.88 मीटर लांब उडी मारली. त्यामुळे त्याने पहिल्या तीन जणांमध्ये जागाही मिळवली होती. पण स्वित्झर्लंडच्या सिमॉन एहॅमर आणि जपानच्या युकी हाशिओका यांनी त्याला मागे टाकले.

मुरलीने चौथ्या प्रयत्नात 7.59 मीटर आणि पाचव्या प्रयत्ना 7.66 मीटर लांब उडी मारली. पहिल्या क्रमांक मिळवलेल्या बहामासच्या लाक्वान नायर्नने 8.11 मीटर लांब उडी मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT