Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: 'साऱ्या भारतीयांसाठी हे पदक...', वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर नीरजनं देशवासियांनाही केलं खूश

Neeraj Chopra: वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचल्यानंतर नीरजने भारतीय चाहत्यांनाही त्याच्या वक्तव्याने खूश केले आहे.

Pranali Kodre

Neeraj Chopra dedicate his World Athletics Championships 2023 Gold Medal to whole India:

भालाफेकपटू नीरज चोप्राला भारताचा गोल्डन बॉय असंही म्हटलं जातं. त्याने त्याला दिलेली ही उपमा वेळोवेळी सिद्धही केली आहे. नुकतेच रविवारी रात्री नीरजने वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने त्यानंतर केलेल्या भाष्याने सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत.

मी सर्वांना धन्यवाद म्हणतो की तुम्ही सर्व रात्री जागत आहात आणि मला पाठिंबा दिला. हे पदक संपूर्ण भारतासाठी आहे. मी आधी ऑलिम्पिक आणि आता वर्ल्ड चॅम्पियन आहे. आपण भारतीय काहीही करू शकतो. अजून चॅम्पियन बनतील. फक्त मेहनत करत राहा.

नीरज वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच हे त्याचे या स्पर्धेतील दुसरे, तर भारताचे एकूण तिसरे पदक आहे. नीरजने गेल्यावर्षी युजिनला झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तसेच त्याआधी 2005 साली अंजू बॉबी जॉर्जने महिला लांब उडीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज असेही म्हणाला की 'हे छान आहे. ऑलिम्पिक नंतर मला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकायची होती. मला फक्त पुढे भाला फेकायचा होता. राष्ट्रीय संघासाठी हे शानदार आहे, पण माझेही वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न होते.'

तसेच नीरज असेही म्हणाला की त्याला देशासाठी पदक जिंकण्याचा अभिमान आहे. पण याबरोबर त्याने असेही सांगितले की या स्पर्धेत त्याचा सर्वोत्तम थ्रो नव्हता, त्याला त्याची कामगिरी आणखी उंचावायची आहे.

तो म्हणाला, 'मला 90 मीटर पेक्षा अधिक लांब भाला फेकायचा होता. पण त्यासाठी सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. मात्र, मी त्या जुळवून आणू शकलो नाही. आशा आहे कदाचीत पुढच्या वेळी हे होईल.'

नीरजने रविवारी अंतिम फेरीत दुसऱ्या प्रयत्नात 88.17 मीटर भाला फेकला. ही कामगिरी त्याला सुवर्ण पदक मिळवून देण्यास पुरेशी ठरली.

दरम्यान, या स्पर्धेत भालाफेकीमध्ये रविवारी पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकीसह रौप्य पदक जिंकले, तर चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 86.67 मीटर भाला फेक करत कांस्य पदक जिंकले.

तसेच याच स्पर्धेत भारताचे डीपी मनू आणि किशोर जेना यांचाही समावेश होता. किशोर जेना 84.77 मीटर भाला फेकत पाचव्या क्रमांकावर राहिला, तर डीपी मनू 84.14 मीटर भाला फेकीसह सहाव्या क्रमांकावर राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT