Neeraj Chopra
Neeraj Chopra Twitter
क्रीडा

Lausanne Diamond League जिंकणारा पहिला भारतीय नीरज चोप्रा- VIDEO

दैनिक गोमन्तक

Lausanne Diamond League: ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. डायमंड लीग मीटचे ल्युसने स्टेज विजेतेपद जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला. यासह त्याने झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी डायमंड लीगची अंतिम फेरी गाठली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासोबतच तो 2023 मध्ये बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

24 वर्षीय नीरज चोप्राने हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. दुखापतीमुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेले चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. चोप्रापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे.

15 वर्षीय लिंथोई चनाम्बमने ऐतिहासिक ज्युदो सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटात पदक जिंकणारा लिंथोई हा देशातील पहिला खेळाडू ठरला. मणिपूरच्या 15 वर्षीय तरुणीने महिलांच्या 57 किलो वजनी गटात ब्राझीलच्या बियान्का रेसला हरवून अव्वल स्थान पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या युवा खेळाडूच्या कामगिरीची माहिती दिली. जुलैमध्ये, बँकॉकमध्ये आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2022 मध्ये लिंथोईने 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

Harmal Road : हरमल-चोपडे रस्‍ता धोकादायक; साकव अपूर्णावस्थेत

Actor Srikanth: अभिनेता श्रीकांत फॅमिलीसोबत गोव्यात करतोय सुट्ट्या एन्जॉय; फोटो व्हायरल!

Loksabha Voting Panaji : पणजीत मतदान कमी का झाले? स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनियोजित कामामुळे पणजीकर नाखुश

Sasashti News : ‘ख्रिश्‍चन’ विवाहासाठी वेळ वाढवा; चर्चिल यांची मागणी

SCROLL FOR NEXT