National Sports Day: Major Dhyan Chand birth anniversary Dainik Gomantak
क्रीडा

National Sports Day: भारतातील हॉकीच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार 'मेजर ध्यानचंद'

National Sports Day: मेजर ध्यानचंद यांची जयंती देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

National Sports Day: Major Dhyan Chand birth anniversary

देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी आपल्या क्षेत्रात इतके यश मिळवले आहे की त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर कायमचे नोंदले गेले आहे. भारतातील हॉकीच्या (Indian Hockey) सुवर्ण काळाचे साक्षीदार मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांचे नावही अशा लोकांमध्ये समाविष्ट आहे.

त्यांनी आपल्या खेळाने वर्चस्व गाजवत ऑलिम्पिक (Olympic) खेळांच्या हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्ण यश मिळवून दिले. विरोधी खेळाडूंच्या ताब्यातून चेंडू हिसकावून विजेचा वेगाने धावणाऱ्या ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. त्यांचा वाढदिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. हॉकीचा महान खेळाडू म्हणून त्याची आठवण केली जाते. त्यांना हॉकीचा जादूगार म्हणण्यामागचे कारण म्हणजे मैदानावरील त्यांची कामगिरी. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 मध्ये तीन ऑलिम्पिक मध्ये देशाला सुवर्णपदके जिंकून दिली होती.

ध्यानचंद यांनी आपल्या कारकिर्दीत 400 हून अधिक गोल केले आहेत . भारत सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

सन 1928 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळण्यासाठी गेलेल्या ध्यानचंदने आपल्या हॉकीची अशी जादू दाखवली की त्याला मैदानावर बघताच विरोधी संघ घाबरू लागले.

साल 1928 मध्ये नेदरलँडमध्ये खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांनी 5 सामन्यांत 14 गोल केले आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. या विजयानंतर हजारो लोकांनी बॉम्बे हार्बरमध्ये संघाचे जोरदार स्वागत केले.

ध्यानचंद हॉकीमध्ये तज्ज्ञ मानले जात होते, प्रत्येकजण त्याच्या गोल-गोल करण्याच्या कलेने आश्चर्यचकित होत होते. यासाठी त्याची हॉकी स्टिक फोडून त्याची चाचणी देखील घेण्यात आली होती . नेदरलँड्समध्ये ध्यानचंदची हॉकी स्टिक तोडून चुंबक आहे की नाही हे तपासले गेले होते.

भारताचा हॉकीमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्यांना भारतीय क्रीडा क्षेत्रातही मानाचे स्थान दिले जाते. विशेष म्हणजे भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT