तनिशा क्रास्टो व ध्रुव कपिला. Dainik Gomantak
क्रीडा

National Senior Badminton: गोव्याची तनिशा क्रास्टो मिश्र दुहेरीत राष्ट्रीय विजेती

ध्रुव कपिला याच्या साथीत अंतिम लढतीत बाजी; अंतिम सामन्यात २५ मिनिटांत विजय

किशोर पेटकर

National Senior Badminton: गोव्याच्या तनिशा क्रास्टो हिने ध्रुव कपिला याच्या साथीत ८५व्या राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीचा किताब पटकावला.

अंतिम सामन्यात त्यांनी नितीन कुमार व नवधा मंगलम जोडीवर २१-१३, २१-८ असा २५ मिनिटांत लीलया विजय प्राप्त केला. आसाममधील गुवाहाटी येथे स्पर्धा झाली. आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलेल्या तनिशा व ध्रुव यांना कडवी लढत देणे नितीन-नवधा जोडीला जमले नाही.

विजयी जोडीने दुसऱ्या गेममध्ये सलग नऊ गुण जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कटक येथे गतआठवड्यात झालेल्या ओडिशा मास्टर्स सुपर १०० स्पर्धेत तनिशा व ध्रुव जोडीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. तोच धडाका तनिशा-ध्रुव जोडीने रविवारीही कायम राखला.

गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी तनिशाचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय सीनियर स्पर्धेतील गोव्यासाठीचे हे पहिले सुवर्णपदक असून ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तनिशासाठी सफल वर्ष

तनिशा क्रास्टो हिच्यासाठी २०२३ वर्ष सफल ठरले. यावर्षी जानेवारीपासून तिने महिला दुहेरीत अनुभवी अश्विन पोन्नाप्पा हिच्या साथीत खेळायला सुरवात केली. जूनमध्ये नँटेस इंटरनॅशनल स्पर्धेत या जोडीने विजेतेपद पटकावले.

नंतर अबुधाबी मास्टर्स या सुपर १०० गटात ही भारतीय जोडी विजेती ठरली. लखनौमध्ये झालेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल या सुपर ३०० स्पर्धेत त्यांना उपविजेतेपद मिळाले, तर गुवाहाटी मास्टर्स या सुपर १०० स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक पटकावला.

ओडिशा मास्टर्स सुपर १०० स्पर्धेत तनिशा-अश्विनीला उपविजेतेपद मिळाले. वर्षाच्या सुरवातीस या जोडीने इंडोनेशिया मास्टर्स या सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेत भाग घेतला. तेथे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मिश्र दुहेरीत तनिशा ध्रुव कपिला याच्यासमवेत ओडिशा मास्टर्स स्पर्धेत विजेती ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT