National Games 2023 beach football  Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2023: ॲथलेटिक्स, जलतरणात नवे विक्रम; बीच फुटबॉलमध्ये गोव्‍याकडून उत्तराखंडचा फडशा

National Games 2023 Goa:आंध्र प्रदेशच्या ज्योती यर्राजी हिने शर्यतीत आपलाच विक्रम मोडला

दैनिक गोमन्तक

National Games 2023 In Goa Update: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्‍समध्‍ये हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या आंध्र प्रदेशच्या ज्योती यर्राजी हिने महिलांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत आपलाच विक्रम मोडताना १३.२२ सेकंद वेळ नोंदविली.

उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामी हिने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

कांपाल येथील तलावात जलतरणात सोमवारी दिल्लीच्या कुशाग्र रावत व भाव्या सचदेव यांनी, तसेच केरळची हर्षिता जयराम यांनी स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. फुटबॉलमध्ये यजमानांना सोमवारी पराभवाचे धक्के सहन करावे लागले.

वास्को येथील टिळक मैदानावर गोव्याच्या महिलांना ‘ब’ गटात सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. यजमानांवर ओडिशाने ४-० फरकाने मात केली. पुरुष फुटबॉल संघाला ‘अ’ गटात सेनादलाकडून १-० फरकाने हार पत्करावी लागली.

कोलवा समुद्रकिनारी गोव्याच्या पुरुष संघाने बीच फुटबॉलमध्ये सलग तिसरा मोठा विजय नोंदविताना उत्तराखंडचा १८-५ असा फडशा पाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT