Nat Sciver Brunt  Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs SL: नॅट सेव्हियर ब्रंटने झळकावले झंझावाती शतक, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला खेळाडू!

ENG vs SL: इंग्लंड महिला क्रिकेट आणि श्रीलंका महिला क्रिकेट यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

Manish Jadhav

ENG vs SL: इंग्लंड महिला क्रिकेट आणि श्रीलंका महिला क्रिकेट यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार नॅट सेव्हियर ब्रंटने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला.

या सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंकेला विजयासाठी 274 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडसाठी सेव्हियर ब्रंटने झंझावाती शतक झळकावले आणि उत्कृष्ट खेळीच्या जोरावर अनेक मोठे विक्रम केले.

सेव्हियर ब्रंटने शानदार खेळी खेळली

ICC महिला खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची फलंदाज आणि अष्टपैलू नॅट सेव्हियर ब्रंट उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. हा तिचा 100 वा एकदिवसीय सामना होता आणि तो संस्मरणीय बनवण्यात तिने कोणतीही कसर सोडली नाही.

पावसामुळे सामना नक्कीच प्रभावित झाला, पण तिने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. तिने माइया बाउचरसोबत मोठी भागीदारी रचली. या दोन खेळाडूंमुळेच इंग्लंडच्या महिला संघाला 273 धावांपर्यंत मजल मारता आली.

अशी करणारी ती पहिली खेळाडू ठरली

नेट सेव्हियर ब्रंटने 74 चेंडूत 18 चौकार आणि एक लांब षटकार मारत 120 धावा केल्या. तिने अवघ्या 66 चेंडूत शतक झळकावले. इंग्लंडसाठी (England) सर्वात जलद शतक झळकावणारी ती महिला खेळाडू ठरली आहे.

याशिवाय, आपल्या 100व्या सामन्यात शतक झळकावणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. श्रीलंकेचे गोलंदाज तिच्यासमोर टिकू शकले नाहीत. दुसरीकडे, माइया बाउचरनेही शानदार खेळी खेळली, परंतु तिचे शतक पाच धावांनी हुकले.

इंग्लंडने 274 धावांचे लक्ष्य दिले होते

श्रीलंकेविरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा टॅमी ब्युमॉंट अवघी एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. एलिस कॅप्सीही 6 धावा करुन बाद झाली.

पण यानंतर माइया बाउचर (95 धावा) आणि नॅट सेव्हियर ब्रंट (120 धावा) यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. बेस हिथने 21 धावांचे योगदान दिले.

याशिवाय, कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेकडून कविशा दिलहरीने सर्वाधिक तीन बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT