Virat Kohli Nana Patekar Death Post Dainik Gomantak
क्रीडा

Nana Patekar Death: क्रिकेटच्या किंगकडून सिनेसृष्टीच्या दिग्गजाला सलाम; नाना पाटेकरांसाठी विराटची भावुक पोस्ट

Virat Kohli emotional post on Nana Patekar: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Sameer Amunekar

Nana Patekar Death Virat Kohli Post

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अभिनयाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांसह क्रिकेट विश्वातील व्यक्तींनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना

नाना पाटेकर यांना क्रिकेटची विशेष आवड होती. ते केवळ क्रिकेट पाहत नव्हते, तर या खेळाशी त्यांचं एक भावनिक नातं असल्याचं अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमधून दिसून आलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा नाना पाटेकर यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक होता. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली केली.

"भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरे दिग्गज, त्यांचे कार्य आणि वारसा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. नाना पाटेकर जी, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती", असं म्हणत विराटने श्रद्धांजली वाहिली आहे.

विराट लवकर बाद झाला तर जेवण्याचा मूड जायचा’

नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान विराट कोहलीबद्दलचा आपला खास किस्सा सांगितला होता. विराट हा त्यांचा आवडता खेळाडू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही तर विराट सामन्यात लवकर बाद झाल्यास आपला मूडच खराब होत असल्याचं नाना पाटेकर यांनी मिश्कील अंदाजात सांगितलं होतं.

विराटच्या फलंदाजीशी त्यांचा किती भावनिक संबंध होता, हे या वक्तव्यावरून लक्षात येतं. विराटने मैदानावर चांगली कामगिरी करावी, मोठी खेळी करावी, अशी नाना पाटेकरांची इच्छा असायची. त्यामुळे विराट बाद झाल्यानंतर सामना पाहण्याची त्यांची उत्सुकताही कमी व्हायची.

नाना पाटेकर आणि क्रिकेटचं खास नातं

नाना पाटेकर यांचं क्रिकेटवरील प्रेम सर्वश्रुत होतं. वाढत्या वयातही क्रिकेटविषयीची त्यांची उत्सुकता कायम राहिली. भारतीय संघाचे सामने, स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे त्यांचं विशेष लक्ष असायचं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातूनही प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक पैलू होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि बेधडक शैलीमुळे ते कायम चर्चेत राहिले. अभिनयातील त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

सचिन तेंडुलकरनेही वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने कला आणि क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

नाना पाटेकर हे स्पष्टवक्तेपणा, साधेपणा आणि आपल्या मातीशी असलेली नाळ यासाठी ओळखले जात होते. अभिनय करताना त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपली वेगळी छाप निर्माण केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांना वास्तववादी स्पर्श देत त्या प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या. नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त आपल्यासाठी अत्यंत दुःखद असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी म्हटले.

चाहत्यांकडूनही आठवणींना उजाळा

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आठवणींपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या. विराट कोहलीबद्दलचा त्यांचा किस्साही आता पुन्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. एका बाजूला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकाराचं निधन आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटमधील त्यांच्या आवडत्या खेळाडूकडून मिळालेली श्रद्धांजली, यामुळे नाना पाटेकर आणि विराट कोहली यांच्यातील हा खास कनेक्शन चाहत्यांच्या लक्षात राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

DA Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत चार बडे निर्णय

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

SCROLL FOR NEXT