Namibia's Jan Nicol Loftie-Eaton hit fastest Men's T20I centuey  X/ICC
क्रीडा

Fastest Century: धुरळाचं...! फक्त 33 चेंडूत सेंच्युरी...नामिबियाच्या क्रिकेटरचा T20I मध्ये धमाका; रोहितचाही मोडला विक्रम

Jan Nicol Loftie-Eaton Century: नामिबियाच्या क्रिकेटपटूने अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकत नवा विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

Namibia's Cricketer Jan Nicol Loftie-Eaton hit fastest Men's T20I century

नामिबिया विरुद्ध नेपाळ संघात मंगळवारी (27 फेब्रुवारी) तिरंगी टी20 मालिकेतील सामना किर्तीपूर येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नामेबियाने 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नामिबियाच्या जॅन निकोल लोफ्टी-इटन याने शतक ठोकत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

लोफ्टी इटनने या सामन्यात अवघ्या 33 चेंडूत शतक ठोकले. त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने नेपाळच्या कुशल मल्लाचा विक्रम मोडला आहे.

2023 मध्ये कुशलने नामिबियाविरुद्धच टी20 सामन्यात 34 चेंडूत शतक केले होते. आंतरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लोफ्टी-इटन आणि कुशल यांच्या पाठोपाठ डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि सुदेश विक्रमसेखरा आहे. या दोघांनी प्रत्येकी 35 चेंडूत शतक केले होते.

आंतरराष्ट्रीय पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटर

  • 33 चेंडू - जॅन निकोल लोफ्टी-इटन (नामिबिया विरुद्ध नेपाळ, 2024)

  • 34 चेंडू - कुशल मल्ला (नेपाळ विरुद्ध नामिबिया, 2023)

  • 35 चेंडू - रोहित शर्मा (भारत विरुद्ध श्रीलंका, 2017)

  • 35 चेंडू - डेव्हिड मिलर(दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, 2017)

  • 35 चेंडू - सुदेश विक्रमसेखरा (झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, 2019)

नामेबियाचा विजय

या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी लोफ्टी-इटनच्या शतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 206 धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लोफ्टी-इटनने 36 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मलन कृगरनेही 59 धावा केल्या. नेपाळकडून रोहित पौडेलने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर नामिबियाने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 18.5 षटकात 186 धावांवर सर्वबाद झाला.

नेपाळकडून दिपेंद्र सिंग ऐरेने सर्वाधिक 48 धावा केल्या, तर कर्णधार रोहित पौडेलने 42 धावा केल्या. तसेच कुशल मल्लाने 32 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. नामेबियाकडून रुबेन ट्रम्पेलमनने 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT