Bangladesh vs Ireland: दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने केवळ 31 चेंडूंचा सामना करत हे शतक झळकावले.
8 वर्षांनंतरही एबीच्या या विक्रमाच्या जवळपास कोणताही खेळाडू पोहोचू शकला नाही. मात्र, बांगलादेशचा अनुभवी स्टार फलंदाज मुशफिकुर रहीमने सोमवारी आपल्या देशासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम मोडीत काढला.
मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim) सोमवारी 60 चेंडूत शतक झळकावले, जे बांगलादेशी खेळाडूचे सर्वात जलद शतक आहे. सिल्हटमध्ये आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर रहीमने ऐतिहासिक कामगिरी केली.
त्याने 166.66 च्या स्ट्राईक रेटने 14 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने हा पराक्रम केला. यापूर्वी, 2009 मध्ये बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) 63 चेंडूत ही कामगिरी केली होती.
डावाच्या 34व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर रहीमचे शतक झाले. यष्टिरक्षक-फलंदाज 100 धावा करुन नाबाद राहिला. यासोबत रहीमने वनडेमध्ये 7 हजार धावाही पूर्ण केल्या.
अशी कामगिरी करणारा तो शाकिब आणि तमिम इक्बालनंतर बांगलादेशचा (Bangladesh) तिसरा फलंदाज ठरला आहे. रहीमच्या नावावर आता 9 वनडे शतके आहेत. बांगलादेशने दोन दिवसांपूर्वी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 338 धावा केल्या.
बांगलादेशने 183 धावांनी दणदणीत विजय नोंदवला, जो धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. येथे, रहीमचे शानदार शतक, नजमुल हुसेन शान्तोच्या 77 चेंडूत 73 आणि तौहिद हृदयॉयच्या 34 चेंडूत 49 धावांच्या बळावर त्यांनी 349/6 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.