इंडियन प्रीमियर लीगचे दोन सर्वात यशस्वी संघ - चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. मुंबईने ही आयपीएल ट्रॉफी पाच वेळा जिंकली आहे, तर चेन्नईने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, परंतु या दोन संघांची आयपीएल-2022 कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही. मुंबईने सहा सामने खेळले आहेत आणि त्यातील सर्व गमावले आहेत तर चेन्नईने सहापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. चेन्नई नवव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माचा संघ सध्या दबावाखाली असून संघाचा क्रिकेट संचालक झहीर खाननेही हे मान्य केले आहे.
हा सामना मुंबईसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा सामना जिंकू शकलो नाही तर ते स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर असेल. चेन्नईसाठीही विजय खूप महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरोचा सामना आहे ज्यात दोन्ही संघ जीव ओतून टाकतील.
मुंबई आणि चेन्नई अनेकदा फायनल खेळले आहेत. दोन्ही संघांमधील एकूण सामन्यांची आकडेवारी पाहिली तर दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. मुंबईने 20 सामन्यात विजय मिळवला आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला नाही आणि त्यामुळे सद्यस्थितीत कोणाचा वरदहस्त असेल हे सांगणे कठीण आहे. आकडेवारीत मात्र मुंबईचा संघ चेन्नईवर जड दिसत आहे.
मागील 5 पाच सामन्यांचे आकडे
गेल्या पाच सामन्यांचे आकडे बघितले तर इथेही मुंबईचा वरचष्मा आहे. मुंबईने गेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर चेन्नईच्या संघाला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. चेन्नईने 19 सप्टेंबर 2021 रोजी खेळलेला सामना जिंकला, तर 1 मे 2021 रोजी खेळलेला सामना मुंबईने जिंकला. 23 ऑक्टोबर 2020 लाही मुंबई जिंकली. 19 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. 12 मे 2019 रोजी मुंबई जिंकली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.