Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Arjun Tendulkar IPL 2022 Auction: अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबईकडेच !

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचा 30 लाख रुपयांमध्ये लिलाव झाला आहे. तो आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचा 30 लाख रुपयांमध्ये लिलाव झाला आहे. तो आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. अर्जुन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. अर्जुन आयपीएल 2021(IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. यावेळी शेवटच्या क्षणी त्याचे नाव आले, आणि ते येताच दावेदार झाले. IPL 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्याला पहिल्यांदा बोली लावली. त्यानंतर गुजरात लायन्सनेही (Gujarat Lions) त्याच्यावर बोली लावली. शेवटी मुंबईने बाजी मारत अर्जुनला पुन्हा 30 लाखांमध्ये खरेदी केले आहे. (Mumbai Indians Have Bought Arjun Tendulkar In The IPL 2022 Auction)

दरम्यान, 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून डाव्या हाताने फलंदाजी करतो. आयपीएल 2021 च्या लिलावात मुंबईने त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेतले होते. शेवटचा खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. मात्र, तो एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर दुखापतीमुळे अर्जुन स्पर्धेतून बाहेर पडला. अर्जुन तेंडुलकरने आत्तापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी फक्त टी-20 क्रिकेट खेळले आहे. त्याच्या नावावर दोन सामन्यांत दोन विकेट्स आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) त्याने हे सामने खेळले आहेत. आता त्याचा रणजी ट्रॉफी 2022 च्या मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे. तो प्रथम श्रेणीत पदार्पण करेल अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

अर्जुन हा भारत आणि इंग्लंडचा नेट बॉलर राहिला

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय अंडर 19 क्रिकेट टीमचा देखील भाग राहीला आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या नेट बॉलरच्या भूमिकेतही दिसला आहे. तो इंग्लंड क्रिकेट संघासोबतही राहीले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) कसोटी मालिकेपूर्वी त्याने इंग्लंड संघात नेट गोलंदाज म्हणून काम केले. नेट बॉलर म्हणूनही तो भारतीय संघात आहे.

मुंबईने अर्जुन घेतला, मग घराणेशाहीचे आरोप झाले

मागच्या वर्षी अर्जुनला मुंबई इंडियन्सने आपल्या टीममध्ये घेतले होते. तेव्हा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले होते. सोशल मीडियावर या विषयावर बरेच काही बोलले गेले. सचिन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर सचिन या संघाचा मार्गदर्शकही आहे. अशा स्थितीत मुंबईतून अर्जुनच्या खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अर्जुनच्या खिलाडूवृत्तीमुळे लिलाव करण्यात आल्याचे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT