Meg Lanning - Harmanpreet Kaur | WPL 2024 | Mumbai Indians vs Delhi Capitals
Meg Lanning - Harmanpreet Kaur | WPL 2024 | Mumbai Indians vs Delhi Capitals X/wplt20
क्रीडा

WPL 2024: प्लेऑफमधील तीन संघ निश्चित, पण पहिला क्रमांक मिळवत कोण गाठणार थेट फायनल? मुंबई-दिल्लीत चुरस

Pranali Kodre

Mumbai Indians, Delhi Capitals Royal Challengers Bangalore Qualify for WPL 2024 Playoffs

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. डब्ल्युपीएलच्या या दुसऱ्या हंगामाच्या प्लेऑफमधील संघ निश्चित झाले आहे. परंतु आता पहिला क्रमांक मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात चुरस आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी यापूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मंगळवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्सला 7 विकेट्सने पराभूत केले. यासह बेंगलोर प्लऑफमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरला.

दरम्यान, आता साखळी फेरीतील अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स संघात होणार आहे. हा गुजरातचा शेवटचा सामनाही आहे, त्यांचे या हंगामातील आव्हान संपले आहे. पण हा सामना जिंकला, तर दिल्लीला थेट अंतिम सामना गाठण्याची संधी आहे.

डब्लुपीएलच्या नियमानुसार गुणतालिकेतील पहिले तीन संघ प्लेऑफमध्ये पोहचतात. तसेच पहिल्या क्रमांकावरील संघ थेट अंतिम सामना गाठतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघाना एलिमिनेटरचा सामना खेळावा लागतो.

बेंगलोरला पहिला क्रमांक मिळवण्याची संधी नाही, कारण त्यांचे साखळी फेरीतील सर्व सामने झाले असून 8 पैकी 4 सामने त्यांनी जिंकले आहे. त्यामुळे त्यांचे 8 गुण आहेत.

परंतु, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांचे आधीच 10 गुण झालेले आहेत. त्यामुळे बेंगलोरला एलिमिनेटरचा सामना खेळावा लागणार हे निश्चित आहे.

परंतु, पहिल्या क्रमांक कोण मिळवणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. मुंबई इंडियन्सचेही सर्व 8 साखळी सामने खेळून झाले असून त्यांनी 5 सामने जिंकले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.

त्यांचा अखेरचा साखळी सामना बाकी असून जर त्यांनी या सामन्यात गुजरातविरुद्ध विजय मिळवला, तर ते 12 गुणांसह अव्वल स्थान निश्चित करत थेट अंतिम सामना गाठतील.

परंतु, जर गुजरातने दिल्लीला पराभूत केले, तर मात्र दिल्ली आणि मुंबई हे दोन्ही संघांचे 10 गुण राहतील, त्यामुळे अशा परिस्थितीत नेट रन रेटच्या नुसार पहिला आणि दुसऱ्या क्रमांकावरील स्थान निश्चित केले जाईल. सध्यातरी दिल्लीचा नेट रन रेट मुंबईपेक्षा अधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT