WPL 2024: गोलंदाजीनंतर फलंदाजीतही चमकली 'ॲलिस पेरी', RCB ठरला प्लेऑफसाठी पात्र; MI चा 7 विकेट्सनी पराभव

WPL 2024: डब्ल्यूपीएलच्या 19व्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा पराभव करुन प्लेऑफसाठी क्वालिफाय केले.
Ellyse Perry and Richa Ghosh.
Ellyse Perry and Richa Ghosh.Dainik Gomantak

WPL 2024: महिला प्रीमियर लीग 2024 च्या 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. ॲलिस पेरीच्या घातक गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सचे सर्व फलंदाज गारद झाले.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते, परंतु 19 षटकात केवळ 113 धावांवर सर्वबाद झाले. यानंतर बंगळुरुने 114 धावांचा पाठलाग करत सामना 7 गडी राखून जिंकला.

या विजयासह बंगळुरुने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले असून प्लेऑफसाठीचे टॉप 3 संघही निश्चित झाले आहेत. तसेच, मुंबई इंडियन्सला अव्वल स्थानी पोहोचणे कठीण झाले आहे.

पेरीचे वादळ दिल्लीत धडकले

नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली होती की, मी नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु तिचा हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला.

हेली मॅथ्यूज आणि सजीवन सजना यांनी मिळून मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करुन दिली आणि पहिल्या विकेटसाठी 43 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. मात्र 23 चेंडूंवर 26 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर सोफी डिव्हाईनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेली मॅथ्यूज ॲलिस पेरीकरवी झेलबाद झाली. ही भागीदारी तुटताच मुंबई इंडियन्सचे एक एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.

Ellyse Perry and Richa Ghosh.
WPL 2024: ॲलिस पेरीची मुंबईविरुद्ध शानदार गोलंदाजी; डब्ल्यूपीएलमध्ये 6 विकेट्स घेत रचला इतिहास

दरम्यान, 65 धावांच्या स्कोरवर मुंबईला दुसरा धक्का सजीवन सजनाच्या रुपाने बसला. या स्कोरवर कर्णधार हरमनप्रीत खाते न उघडता पेरीच्या गोलंदाजीवर बाद झाली. यानंतर 69 वर 4 विकेट, 73 वर 5, 81 वर 6, 82 वर 7, 92 वर 8, 106 वर 9 आणि मुंबई इंडियन्सची शेवटची विकेट 113 धावांवर सायका इशाकच्या रुपाने पडली.

मुंबईची फलंदाजी पाहता त्यांचे फलंदाज फलंदाजीच विसरल्यासारखे वाटत होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू ॲलिस पेरीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 6 विकेट घेतल्या.

दुसरीकडे, 114 धावांचा पाठलाग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिली विकेट 22 धावांवर सोफी मोलिन्यूच्या रुपाने पडली. यानंतर 25 धावांवर बंगळुरुची मोठी विकेट स्मृती मानधानाच्या रुपाने पडली.

39 धावांचा टप्पा गाठताना आरसीबीची तिसरी विकेट सोफी डिव्हाईनच्या रुपाने पडली. येथून मुंबई इंडियन्स या सामन्यात पुनरागमन करु शकेल असे वाटत होते, परंतु ॲलिस पेरी आणि ऋचा घोषच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने सामना जिंकला. पेरीला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आले.

Ellyse Perry and Richa Ghosh.
WPL 2024, MI vs GG: खूब लढी हरमन... मुंबई इंडियन्सचे टॉप 3 मधील स्थान पक्के; गुजरातचा 7 विकेट्सने पराभव

सर्वात मोठा विक्रम केला

दरम्यान, ॲलिस पेरीने महिला प्रीमियर लीगमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तिने असा पराक्रम केला जो यापूर्वी कधीही घडला नव्हता. लीगच्या इतिहासात सहा विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे. तिच्या आधी डब्ल्यूपीएलच्या इतिहासात कोणीही 6 बळी घेतले नाहीत.

या डावात ॲलिस पेरीने 4 षटकांचा शानदार स्पेल टाकला आणि अवघ्या 15 धावा देत मुंबईचे 6 विकेट्स घेतल्या. तिने आपल्या सहा विकेट्सपैकी चार खेळाडूंना क्लीन बोल्ड केले. तिने सजीवन सजना, नेट सीव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर, अमेलिया कर, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्राकर यांच्या विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com